मुंबई – आगामी ४ दिवसाचा राज्यातील पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस ओसरण्याची चिन्हे आहेत. खासकरुन पुढील २४ तासात अतिमुसळधार पावसाचा जोर ओसरणार आहे. महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होऊन उत्तर भारतात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाच्या अंदाजाबाबत हवामान विभागाने जिल्हानिहाय माहिती दिली आहे ती खालील प्रमाणे
लाल रंग – मुसळधार पाऊस, नारिंगी रंग – जोरदार पावसाचा इशारा,
पिवळा रंग – सावधान, लक्ष्य ठेवा, हिरवा रंग – पावसाची शक्यता नाही