गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्रात आबादानी
मुसळधार पावसाची शक्यता
गणेशोत्सवाच्या तोंडावर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. जून पासून थेट सप्टेंबरपर्यंत राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काहीशी चिंता दूर झाली आहे. आता पुन्हा राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
चार दिवसाच्या उघडीपीनंतर, मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भाच्या जिल्ह्यात आज गुरुवार दि.१४ सप्टेंबर ते बुधवार दि.२० सप्टेंबरपर्यन्तच्या सात दिवसासाठी म्हणजे (श्रावणी पोळा ते ऋषींपंचमी दरम्यान) मुसळधार पावसाने सुरवात होवु शकते, असे वाटते. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यातील (१०+८=)१८ जिल्ह्यात मात्र आज शुक्रवार दि. १५ ते मंगळवार दि.१८ सप्टेंबर(श्रावणी पोळा ते हरतालिका) दरम्यानच्या चार दिवसात मध्यम ते मुसळधार पावसाचीच शक्यता जाणवते. त्यानंतरच्या पाच दिवसासाठी म्हणजे मंगळवार ते शनिवार दि.१९ ते २३ सप्टेंबर गणेशोत्वादरम्यान तेथे विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते.
वरील अपेक्षित पावसासाठी खालील ठळक वातावरणीय प्रणाल्या अनुकूल ठरण्याची शक्यता वाटते.
(i)मान्सूनचा ‘आस ‘ सरासरी मूळ जागेपेक्षा अतिदक्षिणेकडे सरकला आहे.
(ii)येत्या २ दिवसात म्हणजे १६ सप्टेंबर दरम्यान बं. उ. सागरातून स्थलांतरित होणारे व छत्तीसगडमधील ‘कोरबा’ जिल्ह्यादरम्यान स्थिरावणारे असे साडेसात किमी उंचीपर्यन्तच्या असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्राहून नैरूक्त मान्सूनी वारे बळकट होवून कोकणातून सह्याद्रीकडे झेपावतील. त्यामुळे कोकण आणि सह्याद्री ओलांडून पश्चिम, उत्तर, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्याच्या काही भागात आर्द्रतायुक्त वारे खेचण्याच्या शक्यतेमुळे जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
रब्बी हंगामासाठीच्या ह्या अपेक्षित पहिल्या आवर्तनातून दुपारनंतर होणाऱ्या वळीव व गडगडाटी स्वरूपाच्या पावसातून सध्या शतकी टक्केवारीच्या आसपास असणाऱ्या महाराष्ट्रातील सहयाद्रीच्या कुशीतील व इतरही सर्व धरणांच्या जलसाठ्यात वाढ होवू शकते असे वाटते. कारण विशेषतः नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर ह्या ४ जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील धरणसमूहात जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
रब्बी हंगामातील पावसाच्या उर्वरित दोन(२५ ते ३० सप्टेंबर व ९ ते १३ ऑक्टोबर) आवर्तनातून चांगला पाऊस अपेक्षित आहे. तेंव्हा कदाचित धरणे ओसंडून नद्याही पूरपाण्याने खळाळतील, असे वाटते. अर्थात त्या-त्या वेळेस त्याबाबत अवगत केले जाईल.
सध्या एव्हढे व इतकेव जाणवते.
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते,
पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Maharashtra Rainfall Forecast Weather Climate