‘पावसाची शक्यता कमी होतेय’
राज्याच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाची प्रतिक्षा अशी स्थिती आहे. आगामी काही दिवसात पावसाचा अंदाज काय आहे याकडे सगळअयांचे लक्ष लागले आहे. त्याविषयी आता आपण जाणून घेऊया…
१- मुंबईसह कोकण व विदर्भातील (७+११) अश्या १८ जिल्ह्यात तसेच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता पुढील आठवडाभर कायम जाणवते.
२- उर्वरित मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील नांदेड वगळता ७ जिल्ह्यात अश्या एकूण १७ जिल्ह्यात पुढील आठवडाभर केवळ मध्यम पावसाचीच शक्यता जाणवते.
३-पावसासाठी अरबी समुद्रातील तटीय आस व्यतिरिक्त सर्व प्रणाल्या आघाडीवर असुनही पावसाची गैरहजेरी खरं तर मान्सून पावसाच्या भाकिताची संधीग्धता वाढवत आहे.
इतकेच!
माणिकराव खुळे