राज्यात पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज
गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे हवामान खुपच बदलले आहे. खासकरुन अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात राज्याचे हवामान कसे असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वाराखंडिता प्रणाली नरमाईकडे, वातावरण टिकून पण अवकाळीची तीव्रता कमी होणार असे साधारणतः चित्र राहणार आहे.
आज दि. ४ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी वातावरणाची तीव्रता काहीशी कमी होवून रविवार दि.७ मे पर्यन्त(४ दिवस) तुरळक ठिकाणीच अगदी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
पुढील २ दिवसानंतर महाराष्ट्रात हळूहळू दिवसाच्या तापमानात २-३ डिग्रीने वाढ होण्याची शक्यता असली तरी कमाल तापमान सरासरी इतकेच राहण्याची शक्यता असुन कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही.
मंगळवार दि.९ मे च्या दरम्यान दक्षिण अंदमान बेटांच्या पश्चिम किनारपट्टीसमोर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत असुन महाराष्ट्रावर त्याचा विशेष परिणाम जाणवणार नसला तरी गेल्या दोन महिन्यापासून घोंगावत असलेली ‘वारा-खंडितता’ प्रणालीमुळे मंगळवार दि.९ मे पासुन महाराष्ट्राची अवकाळी वातावरणापासून सध्या कदाचित सुटका होवु शकते असे वाटते.
सध्या इतकेच!
वातावरणात काही विशेष बदल झाल्यास लिहिले जाईल.
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
पुन्हा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट द्यI pic.twitter.com/6vMlxb75IP
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 3, 2023
Maharashtra Rainfall Forecast Climate Weather