– महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज –
वातावरणीय प्रणाली मार्ग बदलातून
महाराष्ट्रात पावसाची तीव्रता होणार कमी
संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे पावसाकडे लागले आहेत. आता बरसणार, उद्या बरसणार असे अंदाज येत आहेत. त्यातच शेतकरीही हवालदिल झाला आहे. अशा स्थितीत आता पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज काय आहे हे जाणून घेऊया…
सध्याची ‘ कमी दाब क्षेत्र ‘ प्रणाली पूर्व मध्य प्रदेशातून वक्रकार मार्गाने गुजराथमध्ये उतरण्याच्या शक्यतेमुळे सध्या म. प्रदेशमध्ये जोरदार पाऊस होत असुन तेथे नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.
येत्या दोन दिवसात गुजराथमध्येही पावसाची तीव्रता अशीच वाढू शकते.
गेल्या २४ तासात झालेल्या ह्याच वातावरणीय प्रणाली बदलातून, सप्टेंबर १६ ते १९ दरम्यानच्या ४ दिवसात महाराष्ट्रात अपेक्षित असलेल्या मध्यम ते जोरदार पावसाची तीव्रता ह्यामुळेच कमी झाली आहे.
रब्बीच्या ह्या पहिल्या आवर्तनातून महाराष्ट्रात केवळ खान्देश, पालघर, उत्तर विदर्भ(अमरावती अकोला बुलढाणा) जिल्ह्यातच पावसाने काहीशी समाधानकारक सलामी दिली. सध्या तेथेच व मुंबईसह उत्तर कोकणात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
उर्वरित महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे सं. नगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड व उर्वरित विदर्भातील जिल्ह्यात पुढील ७ दिवसात(२३ सप्टेंबर पर्यन्त)आता केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवू लागली आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर जिल्यात पुढील ७ दिवसात,(२३ सप्टेंबर पर्यन्त) तर पावसाची शक्यता फारच कमी जाणवते.
बदल इतकाच!
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Maharashtra Rainfall Climate Weather Forecast Prediction