मंगळवार, ऑक्टोबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

क्या बात हे! महाराष्ट्र होणार रेल्वे फाटक मुक्त; मंत्री नितीन गडकरींची घोषणा

एप्रिल 15, 2023 | 7:00 pm
in राज्य
0
Railway Crossing e1675170058734

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुढील पाच वर्षाच्या आत महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन विभाग राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल . केंद्रीय रस्ते निधी -सीआरएफ मधून सुमारे १६००० कोटी रुपयांच्या तरतुदीने महाराष्ट्रामध्ये रोड ओवर ब्रिजची योजना राबवली जाईल. सध्या राज्यामध्ये १ ,२०० कोटी रुपयांच्या तरतुदीने २५ आरओबी बांधले जातील अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केली .

महारेल या महाराष्ट्र शासन तसेच रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे सुमारे ३०६ कोटी रुपयांच्या ६ उड्डाणपूलांचे (आरओबी )लोकार्पण तसेच ६०० कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आज अजनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते संपन्न झाला . त्यावेळी ते बोलत होते .या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दुरदृश्य प्रणालीव्दारे संबोधित केले. याप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस , रामटेकचे खासदार कृपाल तुमाने , महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.

मंजूर केलेल्या २५ आरओबी मध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने नागपूर शहरातील अजनी रेल्वे स्थानकावरील सहा पदरी दुहेरी केबल स्टेड उड्डाणपुलाचे भूमिपूजन आज करण्यात आले . या संदर्भात माहिती देताना गडकरी यांनी सांगितलं की , अजनीचा हा पूल ब्रिटिशकालीन असून तो १९२७ मध्ये बांधला गेला होता . या पूलावरील जड वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आता बंद केली असून महाराष्ट्र शासनाने महारेलच्या माध्यमातून येथे तीन लेन चा दुहेरी ब्रिज मंजूर केला असून याच्या दोन्ही बाजूला १.५ मीटरचे फुटपाथ देखील मंजूर केले आहेत . या पुलावर होणाऱ्या एलईडी लाइट्सच्या सुशोभीकरणामुळे हा ब्रिज एक ‘आयकॉनिक ‘ ब्रिज ठरणार असून त्यांनी या पुलाच्या बांधकामाच्या भूमिपूजनाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.

अजनीच्या पुलाव्यतिरिक्त अमरावती – बडनेरा, अमरावती – निंभोरा, अमरावती -नरखेड या अमरावती जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी रोड, यवतमाळ जिल्ह्यातील वणी – वरोरा ,मांजरी ते पिंपळखुटी सेक्शन अशा एकूण ५ आरओबीचे आज भूमिपूजन करण्यात आलं. याव्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील इतवारी सेक्शन , डेप्टी सिग्नल ,दिघोरी ते इतवारी, नाईक तलाव ते बांगलादेश या आरोबींचं त्याचप्रमाणे सांगली , सोलापूर , लातूर ,बुलढाणा जिल्ह्यातील काही आरोबीच्या बांधकामाला देखील मंजुरी देण्यात येत आहे अशी घोषणा गडकरी यांनी यावेळी केली .

केंद्रीय रस्ते निधी मधूनच नागपूर शहर आणि जिल्ह्यात सुमारे ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीची नवीन कामांची घोषणा सुद्धा गडकरी यांनी याप्रसंगी केली . या कामांमध्ये प्रामुख्याने झिरो माइल – टेकडी – ते सायन्स कॉलेजचा अंडरपास , राधे मंगलम कार्यालय -रिंग रोड ते ऑरेंज सिटी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण , शताब्दी चौक ते मनीष नगर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण ,मंगलमूर्ती चौक ते जयताळा लास्ट बस स्टॉप रस्त्याचे सिमेंटीकरण, चौधरी मेडिकल -झिंगाबाई टाकळी ते अवस्थी नगर या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण , शंकरपूर – मिहान – चिंचभवन रस्त्याचे सिमेंटीकरण , प्लायवुड ते भेंडे लेआउटची सुधारणा , एअरपोर्ट ते एचबी टाउन चे सिमेंटीकरण बोरगाव चौक ते गोरेवाडा येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण , बुटीबोरी उमरेड रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण ,वाडी -खडगाव – लावा या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये दहेगाव – इसापूर येथील पुलाच्या बांधकामाचा समावेश आहे.

याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की महारेल मुळे केवळ विदर्भातच नव्हे तर राज्यामध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधाच रूप बदलत आहे. जनतेच्या पैशाची तसेच इंधनाची बचत होण्यासाठी तसेच फाटक विरहित वाहतूक होण्यासाठी १०० आरोबीची उभारणीय महारेलद्वारे करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर तसेच अजनी या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास रेल्वे मंत्रालयाद्वारे केला जात असून ही स्थानके जागतिक दर्जाची बनवले जात असल्याचा उल्लेख केला . नागपूरचे बसस्थानक -बसपोर्ट सुद्धा प्रवाशांच्या सुविधे करिता अत्याधुनिक सुविधांनी युक्त तयार करण्यासाठी महारेल काम करेल अशी घोषणा त्यांनी केली. याप्रसंगी त्यांनी नागपुरात सुरू असलेल्या विकास कार्याची माहिती सुद्धा उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक भाषणातून महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांनी सांगितलं की, अजनी पूल दोन चरणामध्ये बनणार असून तीन लेनचा पहिला पूल बनल्यानंतर सध्याचा अस्तित्वात असलेला पूल तोडण्यात येईल त्यानंतर दुसरा ब्रिज बनविण्यात येणार आहे. पहिल्या पुलाची निर्मिती जून २०२४ मध्ये तर दुसऱ्या पुलाचे बांधकाम मार्च २०२५ च्या अखेर पूर्ण होईल असे देखील त्यांनी सांगितलं.

आज लोकार्पण झालेल्या रेल्वे रोडवर ब्रिज मध्ये उमरेड भिवापूर बायपासवरील उडान पूल, भरतवाडा , कोहळी पासून ते कळमेश्वर रेल्वे स्टेशन यावरील उडान पूल, बोरखेडी ते सिंधी रेल्वे यादरम्यान उडान पूल, नांदगाव रूट वरील रेवराळ ते तारसा रेल्वे स्टेशन वरील उड्डाणपूल या कामांचा समावेश आहे. या कामाचे लोकार्पण गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी रिमोटची कळ दाबून आभासी पद्धतीने केले .या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, महारेलचे अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Railway Crossing Minister Nitin Gadkari

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिककरांनो निराशेला दूर सारा.. मन मोकळे करा… आणखी तिघांची शहरात आत्महत्या

Next Post

कोल्हापूर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली आणि शैक्षणिक साहित्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Next Post
kol1

कोल्हापूर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली आणि शैक्षणिक साहित्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011