नवी दिल्ली – २०२३ साठीचे विविध स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध स्पर्धांत्मक परिक्षा दरवर्षी घेतल्या जातात. या परिक्षांचे नियोजन करताना, संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठ, परिक्षा घेणा-या इतर संस्था आदींकडून आयोजित करण्यात येणा-या परिक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या पीरक्षांचे वेळापत्रक निश्चित केले जाते. यामुळे खेड्यापाड्यातील गरीब व होतकरू उमेदवारांना आयोगामार्फत आयोजित परिक्षांचा लाभ मिळेल या दृष्टीने वर्ष २०२३ चे वेळापत्रक तयार करताना दक्षता घेण्यात आलेली आहे.
सोबत आयोगाचे अंदाजित वेळापत्रक जोडलेले आहे.