मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियान प्रिमिअर लिग (आयपीएल) नंतर आता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमिअर लिग (एमपीएल)ची जोरदार तयारी सुरू आहे. खेळाडूंच्या लिलावात नौशाद शेख हा सर्वांत महागडा क्रिकेटपटू ठरला. कोल्हापूर टस्कर्सने नौशादला ६ लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली. दिव्यांग हिंगणेकरला रत्नागिरी जेटसने ४ लाख ६० हजार रुपयांत खरेदी केले.
साहिल औताडे (३ लाख ८० हजार), अंकित बावणे (२ लाख ८० हजार) या खेळाडूंना कोल्हापूरने मिळविले. सोलापूरने सत्यजित बच्छावला चार लाख ६० हजार रुपयांना खरेदी केले. शमशुझमा काझीला (२ लाख ८० हजार) छत्रपती संभाजीनगर किंग्ज, सिद्धेश वीरला (२ लाख ६० हजार) ईगल नाशिक टायटन्सने, आशय पालकर आणि कौशल तांबेला (प्रत्येकी २ लाख ४० हजार) देखिल नाशिकने खरेदी केली. पुणेरी बाप्पा संघाने सुरज शिंदेसाठी २ लाख ४० हजार, तर रोहन दामलेसाठी २ लाख रुपयांची बोली लावली.
सचिन धस महागडा खेळाडू
लिलावासाठी ३०० हून अधिक खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये अ गटात रणजी करंडक खेळाडूंचा समावेश होता. त्यांची ६० हजार ही पायाभूत रक्कम निश्चित करण्यात आली होती. १९ वर्षांखालील आणि ब गटातील खेळाडूंसाठी ४०हजार रुपये किंमत ठरविण्यात आली होती. क गटासाठी २० हजार रुपये ही पायाभूत किंमत होती. खेळाडूंच्या खरेदीसाठी सहाही फ्रॅंचाईजींना २० लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली होती. फ्रॅंचाईजींना संघात १६ खेळाडूंचा समावेश करायचा होता. यामध्ये १९ वर्षांखालील दोन खेळाडू असणे अनिवार्य होते. १९ वर्षांखालील गटातून सचिन धस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोल्हापूर संघाने सचिनसाठी १ लाख ५० हजाराची बोली लावली.
सहभागी संघांची नावे निश्चित
एमपीएलच्या शिखर समितीने या वेळी सहभागी संघांची नावेही निश्चित केली. सुहाना मसालेवालेंचा पुणे संघ हा ‘ पुणेरी बाप्पा ‘ नावाने ओळखला जाईल. ऋतुराज गायकवाड हा या संघाचा आयकॉन खेळाडू असेल. पुनित बाल समुहाचा संघ कोल्हापूर टस्कर्स (केदार जाधव), ईगल इन्फ्रा इंडियाचा संघ ईगल नाशिक टायटन्स (राहुल त्रिपाठी), वेंकटेश्वरा इंडस्ट्रिजचा संघ छत्रपती संभाजी किंग्ज (राजवर्धन हंगरर्गेकर), जेटस सिंथेसिसचा संघ रत्नागिरी जेटस (अझीम काझी), कपिल सन्सचा संघ सोलापूर रॉयल्स (विकी ओस्तवाल) अशा नावाने ओळखला जाईल. रुतुराज गायकवाड (पुणेरी बाप्पा), केदार जाधव (कोल्हापूर टस्कर्स); राहुल त्रिपाठी (ईगल नाशिक टायटन्स) राजवर्धन हंगरगेकर (छत्रपती संभाजी किंग्स, अझीम काझी (रत्नागिरी जेट्स), विकी ओत्सवाल (सोलापूर रॉयल्स) यांना यापूर्वीच आयकॉन खेळाडू म्हणून नामांकित करण्यात आले आहे.
संघ, खेळाडू आणि लिलावातील त्यांची किंमत अशी
१) ईगल नाशिक टायटन्स
सिद्धेश वीर ( २,६०,०००);
आशय पालकर ( २,४०,०००
अर्शीन कुलकर्णी (१,४०,०००)
इझान सय्यद (७०,०००)
प्रशांत सोळंकी (२,४०,०००)
कौशल तांबे (२,४०,०००)
हर्षद खडीवाले (१,२०,०००)
मंदार भंडारी (१,८०,०००)
२) पुणेरी बाप्पा :
अझर अन्सारी (१,००,०००)
वैभव चौघुले (१,६०,०००)
रोशन वाघसरे (१,१०,०००)
पियुष साळवी (१,४०,००० )
यश क्षीरसागर (१,४०,०००)
पवन शहा (२,२०,०००)
हर्ष संघवी (८०,०००)
सुरज शिंदे (२,४०,०००)
३) कोल्हापूर टस्कर्स :
नौशाद शेख (६,००,०००)
अक्षय दरेकर (८०,०००)
श्रेयश चव्हाण (९०,०००)
तरनजीत ढिल्लोन (१,६०,०००)
अंकित बावने (२,८०,०००)
सचिन धस (१,५०,०००)
साहिल औताडे (३,८०,०००)
४) रत्नागिरी जेटस
दिव्यांग हिंगणेकर (४,६०,०००)
किरण चोरमाले (१,१०,०००)
धीरज फटांगरे (८०,०००)
प्रीतम पाटील (६०,०००)
निकित धुमाळ (२,६०,०००)
प्रदीप दाढे (२,६०,०००)
निखिल नाईक (३,४०,०००)
रुषिकेश सोनवणे ( ६०,०००)
५) छत्रपती संभाजी राजे
मोहसीन सय्यद (८०,०००)
जगदीश झोपे (१,००,०००)
हितेश वाळूंज (२,२०,०००)
ओम भोसले (८०,०००)
शमसुजामा काझी (२,८०,०००)
आनंद थेंगे (१,१०,०००)
मुर्तुझा ट्रंकवाला (१,८०,०००)
रंजीत निकम (२,२०,०००)
अनिकेत नलावडे (४०,०००)
स्वप्नील चव्हाण (४०,०००)
हर्षल काटे (१,००,०००)
तनेश जैन (५०,०००)
सौरभ नवले (२,६०,०००)
अभिषेक पवार (४०,०००)
६) सोलापूर रॉयल्स
सत्यजीत बच्छाव (३,६०,०००)
सुनील यादव (१,००,०००)
यश बोरकर (५०,०००)
प्रथमेश गावडे (६०,०००)
प्रणय सिंह (७०,०००)
प्रवीण देशेटी (२,००,०००)
अथर्व काळे (१४०,०००)
यश नहार (३,८०,०००)
मेहुल पटेल (४०,०००)
यासर शेख (४०,०००)
स्वप्नील फुलपागर (८०,०००)
विशांत मोरे (६०,०००)
रुषभ राठोड (१,८०,०००)
Maharashtra Premier League MPL Players Auction