मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तुफात वाकयुद्ध रंगले आहे. दोघांनीही एकमेकांवर टीका करत तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या या दोघांमध्ये सुरू असलेल्या शाब्दीक चकमकी राजकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे.
पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. ‘देवेंद्र फडणवीस यांनी परिवारावर बोलू नये, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सअॅप चॅट बाहेर आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ‘मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते,’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस उत्तर दिले. त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे.
ट्वीटच्या माध्यमातून दिले उत्तर
उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस लिहितात की, ‘मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.
फडणवीस काय म्हणाले
मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे !
ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.
चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा
सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर…
मुंबईला कुणी लुटले यावर…
मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर…
मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर…
100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर…
तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा)
तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…
बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…