बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सत्ताधारी शिंदे आणि पवार गटात पहिली ठिणगी पडली…

by Gautam Sancheti
जुलै 13, 2023 | 4:10 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
shinde pawar

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले सध्या शिंदे गटाच्या सर्वांत अस्वस्थ आमदारांपैकी एक आहेत. मंत्रीमंडळाच्या विस्तारातून त्यांना खूप अपेक्षा आहेत आणि ती अपेक्षा धुसर होत असल्याचे त्यांना वाटले की ते आक्रमक होतात. आता त्यांनी असे काही विधान केले की त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर चांगल्याच भडकल्या आहेत.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा विषय शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमित्ताने चांगलाच चर्चेत आहे. याठिकाणी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले दोघांनीही दावा ठोकला आहे. मुख्य म्हणजे गोगावले यांना अद्याप मंत्रीमंडळात समावेशाची केवळ अपेक्षाच आहे. अर्थात तसा त्यांचा हट्टच आहे. पण आदिती तटकरे यांनी तर मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे. त्यामुळे गोगावले यांच्या पदरी निराशा पडू शकते, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी आदिती तटकरेंच्या निमित्ताने एक वादग्रस्त विधान केले आणि त्यानंतर त्यांच्यावर चाकणकर भडकल्या.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत दावा करताना गोगावले म्हणाले, ‘मी आदिती तटकरेंपेक्षा चांगले काम करू शकतो. महिला व पुरुष यांच्यात थोडा तरी फरक येतोच ना. त्यांच्यापेक्षा मला आमदारकीचा १५ वर्षांचा जास्त अनुभव आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन सहाच्या सहा आमदारांसह आमची सगळ्यांची एकच मागणी आहे… रायगडचा पालकमंत्री भरतशेठ.’ महिलांच्या संदर्भात केलेल्या विधानाने रुपाली चाकणकर चांगल्याच भडकल्या आहेत.

काय म्हणाल्या चाकणकर?
आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो. जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं. आपण त्या रायगडमधून येता जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना ‘सखी राज्ञी जयती’ असा सन्मान करून त्यांच्या अनुपस्थित राज्यकारभार चालवण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी. आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते, या शब्दांत चाकणकर यांनी गोगावलेंचा समाचार घेतला आहे.

स्त्री-पुरुष मानसिकता
गोगावलेंच्या बोलण्यातून त्यांच्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे, अशी टीका चाकणकर यांनी केली. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिले. पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे, असेही चाकणकर ट्विटमध्ये म्हणतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भीषण अपघातांमुळे सरकारला खडबडून जाग… खासगी बसेसमध्ये आता हे सर्व सक्तीचे

Next Post

शहांच्या मध्यस्थीने काय तोडगा निघाला? राष्ट्रवादीचा दिल्ली दौरा यशस्वी झाला का? खातेवाटप की विस्तार?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Screenshot 20250827 184001 Dailyhunt
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी…बाप्पाचे घेतले दर्शन

ऑगस्ट 27, 2025
2 1 1 1024x681 1
संमिश्र वार्ता

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये मिळणार…

ऑगस्ट 27, 2025
539613361 1218995730272784 914712606899021038 n
स्थानिक बातम्या

मुंबई येथे नाशिकच्या उद्योजकांच्या संघटनेसोबत वीज दराबाबत महत्त्वपूर्ण बैठक….ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 27, 2025
accident 11
क्राईम डायरी

देवदर्शनासाठी रस्त्याने पायी जाणा-या महिलेस दुचाकीची धडक…उपचारादरम्यान मृत्यू

ऑगस्ट 27, 2025
facebook insta
क्राईम डायरी

फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट स्विकारणे महिलेस पडले महागात…सव्वा सोळा लाखाला गंडा

ऑगस्ट 27, 2025
GzWXER0a4AICfsU scaled e1756290053297
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणेशाचे आगमन…बाप्पाला घातले हे साकडे (बघा, व्हिडिओ)

ऑगस्ट 27, 2025
Manoj Jarange Patil
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला रवाना…ठिकठिकाणी स्वागत,पत्नी व मुलीला अश्रू अनावर

ऑगस्ट 27, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

या महाविद्यालयातील २१ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…महाराष्ट्रातील २ शिक्षकांचा समावेश

ऑगस्ट 27, 2025
Next Post
shinde fadanvis pawar1 e1710312448933

शहांच्या मध्यस्थीने काय तोडगा निघाला? राष्ट्रवादीचा दिल्ली दौरा यशस्वी झाला का? खातेवाटप की विस्तार?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011