मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी निवडणुकांसंदर्भात अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात दौरे सुरू केले असताना आता त्यांना शह देण्यासाठी अजित पवार गटाने जिल्हावार जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. याद्वारे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जाणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राज्यात नव्यानं संघटनात्मक बांधणी केली जात आहे. यासाठी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये पक्ष आणि संघटनवाढीची जबाबदारी देण्यात आली आहे.
मा. मंत्री महोदयांवर पक्ष संघटनेकरता जबाबदारी दिलेले जिल्हे खालीलप्रमाणे
मा. ना. अजित पवार – पुणे, सातारा, सांगली व सोलापूर
मा. खा. प्रफुल पटेल – भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूर
मा. ना. छगन भुजबळ – नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर
मा. ना. दिलीप वळसे पाटील – अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा
मा. ना. हसन मुश्रीफ – कोल्हापूर, सिंधुदूर्ग, व अहमदनगर
मा. ना. धनंजय मुंडे – बीड, परभणी, नांदेड, व जालना
मा. ना. संजय बनसोडे – हिंगोली,लातूर, व उस्मानाबाद
मा. ना. अदिती तटकरे – रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर
मा. ना. अनिल पाटील – जळगाव, धुळे, व नंदुरबार
मा. ना. धर्मारावबाबा आत्राम – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ
Maharashtra Politics NCP Ajit Pawar Faction Minister District Responsibility