शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्रात आता यासाठी होणार आमदारांची फोडाफोडी; राजकीय घडामोडींना वेग

डिसेंबर 9, 2022 | 5:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Sharad Pawar Ashish Shelar

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीतून निर्माण झालेला अभूतपूर्व राजकीय धुराळा अद्यापही मिटलेला नाही. असे असतानाच आता पुन्हा राजकीय घडामोडींना ऊत झाला आहे. निमित्त आहे ते विधान परिषद सभापतीपद निवडीचे.  हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सभापतीपद आपल्याकडे कसे घेता येईल, यासाठी भाजपने चाचपणी सुरू केली आहे. सध्या रिक्त असलेल्या या पदावर भाजपच्या सदस्याची निवड करण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सद्यस्थितीत विधानपरिषदेच्या ७८ पैकी २१ जागा रिक्त आहेत. सभागृहाचे संख्याबळ ५७ इतके आहे. भाजपकडे २२ सदस्य आहेत. निवडणूक झाली तर ती जिंकण्यासाठी भाजपला २९ मते लागणार आहेत. म्हणजेच आणखी सात मतांची गरज लागणार आहे. रासपचे महादेव जानकर हे नाराज असले तरी ते भाजपसोबत असतील, असे मानले जात आहे. तसेच अपक्ष व लहान पक्षांच्या मदतीने हे संख्याबळ गाठता येईल का, याची चाचपणी केली जात असल्याचे समजते.

विधान परिषदेचे उपसभापतीपद हे उद्धव ठाकरे गटाच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. त्यामुळे सभापतीपद आपल्याकडे घेण्यात भाजपला विशेष स्वारस्य असल्याचे सांगितले जात आहे. नागपूर अधिवेशनात पहिल्या एक – दोन दिवसातच सभापतीपदाची निवड करावी, असे भाजपचे प्रयत्न आहेत. विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांच्याकडे कायम ठेवून विधान परिषद सभापती पदासाठी राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्नही केले जाऊ शकतात. राज्यपाल नियुक्त १२, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या ९ अशा एकूण २१ जागा सध्या रिक्त आहेत.

यांच्या नावाची चर्चा
भाजपकडून सभापती पदासाठी माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. तसेच प्रवीण दरेकर यांचेही नाव आहे. पण दरेकर यांना विस्तारात मंत्री म्हणून संधी दिली जाऊ शकते. शिंदे यांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावेळी प्रदेशाध्यक्ष पदासाठीही आले होते.

असे आहे सध्याचे संख्याबळ
भाजप – २२
शिवसेना (ठाकरे गट) – ११
राष्ट्रवादी – ९
काँग्रेस – ८
अपक्ष – ४
जदयू, शेकाप, रासप प्रत्येकी – १

Maharashtra Politics MLC Assembly Speaker Election
BJP Congress NCP Shivsena

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एक मुलगा मुस्लिम, दूसरा हिंदू…. आईच्या निधनानंतर निर्माण झाला हा मोठा वाद

Next Post

अखेर ठरलं! आर्यन खान करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री; या भूमिकेत राहणार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
shahrukh aryan khan

अखेर ठरलं! आर्यन खान करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री; या भूमिकेत राहणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011