मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संभ्रमाच्या राजकारणाचा परिणाम महाविकास आघाडीवर होत असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार आणि त्यांचे पुतणे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात उद्योगपतीच्या घरी गुप्त बैठक झाली. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी महाविकास आघाडीत या गुप्त बैठकीमुळे बिघाड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यात प्लॅन बीची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
प्लॅन बीमध्ये शरद पवार शिवाय निवडणूक लढवण्याचा निर्धार काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाने घेतल्याचे सांगितले जात आहे. पण, त्यानंतर शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसने थेट यावर बोलणे टाळले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमचे हायकमांड आता यावर निर्णय घेईल. यावर आम्ही कोणता निर्णय घेण्याचे काही कारण नाही, शरद पवारांच्या भेटी आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच. अशा लपून होणाऱ्या भेटीगाठी बरोबर नाहीत. पण ही सगळी चर्चा उच्च पातळीवर होईल. इंडिया आघाडीच्या पातळीवर होईल. मी यावर काही बोलणे योग्य नाही असे सांगितले.
दरम्यान शरद पवार यांनी या बैठकीबाबत स्पष्टीकरण दिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा कोणताही संभ्रम नसल्याचे सांगितले. माझे शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसची बोलणे झाल्याचेही त्यांनी सांगितले. पण, या स्पष्टीकरणानंतरही महाविकास आघाडीत हा संभ्रम कायम आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या गुप्त बैठकीत अजित पवार यांच्या मार्फत काय ऑफर दिली याची माहिती सुद्धा दिली. त्यात शरद पवार यांना कृषीमंत्रीपद व नीत आयोगाचे अध्यक्षपद देण्याची तयारी दाखवल्याचेही सांगितले. त्याचबरोबर त्यांनी शरद पवार या ऑफरला नकार दिल्याचेही सांगितले. एकुणच या सर्व घडमोडीमुळे मात्र महाविकास आघाडीत संभ्रम कायम आहे.
Maharashtra Politics mahavikas aghadi Ncp Sharad Pawar
Uddhav Thackeray Ajit Pawar UBT Congress Nana Patole