कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा तयार ठेवण्याच्या सूचना दिल्लीतून देण्यात आल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात गुजरातमधील एका वृत्तबत्रात बातमी प्रसिद्ध झाल्याचा दाखलाही अंधारे यांनी दिला आहे. दरम्यान, अंधारे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखीनच खळबळ उडाली आहे.
राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यावर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी स्वतःच केला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. हे सारे होत नाही तोच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा णि खळबळजनक दावा केला आहे.
अंधारे यांनी म्हटले आहे की, गुजरातच्या वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यात म्हटले आहे की, दिल्लीच्या हेटक्वार्टरमधून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजेच, भाजप हे एकनाथ शिंदे यांना कधीही वाऱ्यावर सोडू शकते, असेही अंधारे म्हणाल्या.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जपान दौऱ्यावर होते. मात्र, हा दौरा अर्धवट सोडून नार्वेकर हे अचानक मुंबईत दाखल झाले आहेत. यासंदर्भात अंधारे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, राहुल नार्वेकर यांनी जपानहून परतण्याची स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. म्हणजेच, पडद्यामागे भाजपची बूमिका ठरलेली आहे. ती म्हणजे, एकनाथ शिंदेंना भाजप कधीही वाऱ्यावर सोडू शकते, असा टोला त्यांनी लगावला आहे.
https://t.co/NoZO3mL5Tq
मुख्यमंत्री @mieknathshinde साहेबांना राजीनामा तयार ठेवण्याच्या सूचना अशी गुजराती वर्तमानपत्रातून बातमी आली. परंतु नेमकी बातमी काय असेल अनेकांना प्रश्न पडू शकतात. ही घ्या बातमी. @SaamanaOnline @ShivsenaUBTComm #मुख्यमंत्री_राजीनामा_द्या pic.twitter.com/7Fer4kWKeB— SushmaTai Andhare? (@andharesushama) April 20, 2023
Maharashtra Politics Eknath Shinde CM Resignation Delhi