नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच भूकंप होणार असून मुख्यमंत्रीपदी अजित पवार दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भातील विविध वक्तव्ये होताना दिसत आहेत. अजित पवारांचा मंत्रिमंडळातील समावेश म्हणजे एकनाथ शिंदे यांची एक्झिट असल्याचा दावा ठाकरे गटासह काँग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. त्यात आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे.
शरद पवार सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल असे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्टींकडून अजित पवारांना सांगण्यात आल्याचा दावा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार भाजपाच्या सांगण्यावरुन शरद पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन प्रमुख पक्ष फोडूनही भाजपाची परिस्थिती सुधारत नसल्यामुळे अजित दादा हे शरद पवार यांना भेटत आहे. लोकनेतृत्व असलेले शरद पवार यांची गरज भाजपाला आहे. त्यांची मदत मिळाल्याशिवाय लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही. त्यामुळे अजित दादाच्या शरद पवार यांना भेटत असल्याचे वड्डेटीवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संभ्रमाच्या राजकारणाचा परिणाम महाविकास आघाडीवर होत असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार आणि त्यांचे पुतणे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात उद्योगपतीच्या घरी गुप्त बैठक झाली. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीत या गुप्त बैठकीमुळे बिघाड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यात शरद पवार यांना वगळून प्लॅन बीची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. त्यानंतर वड्डेटीवार यांचा खळबळजनक दावा आला आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या गुप्त बैठकीत अजित पवार यांच्या मार्फत काय ऑफर दिली याची वेगळीच माहिती दिली. त्यात शरद पवार यांना कृषीमंत्रीपद व नीत आयोगाचे अध्यक्षपद देण्याची तयारी भाजपने दाखवल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी शरद पवार या ऑफरला नकार दिल्याचेही सांगितले. एकुणच या सर्व घडमोडीमुळे मात्र महाविकास आघाडीत संभ्रम कायम आहे.
दरम्यान शरद पवार यांनी या बैठकीबाबत स्पष्टीकरण दिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा कोणताही संभ्रम नसल्याचे सांगितले. माझे शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसची बोलणे झाल्याचेही त्यांनी सांगितले. पण, या स्पष्टीकरणानंतरही महाविकास आघाडीत हा संभ्रम कायम आहे. त्यात आता वड्डेटीवार यांनी हा खळबळजनक दावा केल्यामुळे पुन्हा राजकारण चांगलेच तापले आहे.
This claim was made by Vijay Wadettiwar Congress
Maharashtra Politics Ajit Pawar Chief Minister Post
PM Narendra Modi Criteria Sharad Pawar