नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाची माहिती दिली आहे. ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे या प्रकरणाची सुनावणी होत आहे. या आठवड्यात २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातही सलग ३ दिवस सुनावणी झाली. त्यात आताही सलग सुनावणी ठेवण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या या सुनावणीमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. दोन्ही गटांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. याच सुनावणीत न्यायालय स्पष्ट केले की, नबाम रेबिया प्रकरणाचा फेरविचार करण्याची गरज नाही. तसेच, हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्यात येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
साडेसात महिने आणि २० तारखा
हे प्रकरण सात न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून न्यायालयात दोन्ही गटांकडून युक्तीवाद सुरू होता. शिंदे गटाने जोरदार युक्तीवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांची बाजू आक्रमकपणे मांडली. अखेर युक्तीवाद पूर्ण झाला आहे. मात्र, न्यायालयाने आता निकाल राखून ठेवला आहे. हे प्रकरण न्यायालयात जाऊन साडेसात महिने झाले आहेत. तसेच, न्यायालयात आजापर्यंत एकूण २० तारखा झाल्या आहेत. आता २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी नियमित सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, याप्रकरणी आता अंतिम निकाल लवकरच लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
निवडणूक आयोगाला आव्हान
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या निकालाचाही आक्षेप येणार आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी
21 22 आणि 23 तारखेला घटनापीठ करणार सुनावणी*
मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी केल्यानंतर याही आठवड्यात प्रदीर्घ सुनावणी
निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत ठाकरे गटाचा आक्षेपही याच दरम्यान समोर येण्याची शक्यता pic.twitter.com/PfS8rrlw08
— Prashant Kadam (@_prashantkadam) February 19, 2023
Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing This Week