नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आता सगळ्यांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाकडे लागल्या आहेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे या प्रकरणाची सुनावणी होत आहे. आजपासून सलग तीन दिवस म्हणजेच २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यातही सलग ३ दिवस सुनावणी झाली. त्यात आताही सलग सुनावणी ठेवण्यात आली आहे. या आठवड्यात न्यायालय मोठा निकाल देण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या या सुनावणीमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. दोन्ही गटांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. याच सुनावणीत न्यायालय स्पष्ट केले की, नबाम रेबिया प्रकरणाचा फेरविचार करण्याची गरज नाही. तसेच, हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्यात येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
साडेसात महिने आणि २० तारखा
हे प्रकरण सात न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून न्यायालयात दोन्ही गटांकडून युक्तीवाद सुरू होता. शिंदे गटाने जोरदार युक्तीवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांची बाजू आक्रमकपणे मांडली. अखेर युक्तीवाद पूर्ण झाला आहे. मात्र, न्यायालयाने आता निकाल राखून ठेवला आहे. हे प्रकरण न्यायालयात जाऊन साडेसात महिने झाले आहेत. तसेच, न्यायालयात आजापर्यंत एकूण २० तारखा झाल्या आहेत. आता २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी नियमित सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, याप्रकरणी आता अंतिम निकाल लवकरच लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
निवडणूक आयोगाला आव्हान
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे निश्चित केले. त्यानुसार, काल, सोमवारी ठाकरे गटाच्या वकिलांनी याचिका दाखल केली. तसेत, याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. मात्र, यावर उद्यापासून होणाऱ्या सुनावणीतच चर्चा केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार का, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी
21 22 आणि 23 तारखेला घटनापीठ करणार सुनावणी*
मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी केल्यानंतर याही आठवड्यात प्रदीर्घ सुनावणी
निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत ठाकरे गटाचा आक्षेपही याच दरम्यान समोर येण्याची शक्यता pic.twitter.com/PfS8rrlw08
— Prashant Kadam (@_prashantkadam) February 19, 2023
Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing From Today