नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी तीन सुनावण्या झाल्या. मात्र, आजची सुनावणी होते की नाही, अशी शंका होती. शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली. त्यानंतर सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींंच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. आणि या सुनावणीत खंडपीठाने मोठा निर्णय जाहीर केला आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना आणि सत्ता संघर्षाची सुनावणी आता घटनापीठाकडे देण्याचा निर्णय न्यायालयाने आज दिला आहे. म्हणजेच, पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी यापुढे होणार आहे. या पाचही न्यायमूर्तींची निवड सरन्यायाधीश करणार आहेत. म्हणजेच, सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडून या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
पुढील सुनावणीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पाच न्यायमूर्तींच्या उपस्थितीत ही सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यात काय निर्णय होतो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत.
अभूतपूर्व राजकीय संकट आणि घडामोडी राज्यात जुलै महिन्यात घडल्या. आणि आता शिवसेनेतील मोठी फूट थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे यांची की बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची याचा फैसला या सुनावणीत होणार आहे. गेल्या दोन सुनावणीत दोन्ही बाजूने ज्येष्ठ विधीज्ञांनी घमासान युक्तीवाद केला.
त्यातच सरन्यायाधीश एस व्ही रमणा हे २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.
(या सुनावणीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करा)
Maharashtra Political Crisis Supreme Court Big Decision Taken Today
Uddhav Thackeray Shivsena Eknath Shinde
Constitution Bench