मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्षभरापूर्वी झालेल्या शिवसेनेतील बंडानंतर अपात्र आमदारांचा मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार असून येत्या १४ सप्टेंबरला यावर सुनावणी होणार आहे.
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणाचा लवकरच निर्णय लागणार आहे. या प्रकरणाची येत्या विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात १४ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. हे आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपावलं आहे. या प्रकरणाचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.
दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी शिवसेना आमदारांना विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हजर राहण्यास आदेश देण्यात आले आहेत. आमदार अपात्रता प्रकरणी विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात १४ सप्टेंबरला सुनावणी मॅरेथॉन सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीवेळी शिवसेनेचे ५४ आमदार एकाच छताखाली येणार आहेत. वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी मिळणार आहे.
प्रत्येक आमदाराला मांडावे लागणार मत
प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार असून संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावले जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी आमदारांना आपले म्हणणे मांडायला संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर आमदार आपले पुरावे सादर करतील, तसेच एकमेकांना पुराव्याचे पेपर सुद्धा देतील. मग विधिमंडळ सर्वाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर प्रत्येक याचिकेची वेगळी मांडणी करण्यात येईल. विधानभवनात १४ सप्टेंबरला दिवसभर सुनावणी चालणार आहे. प्रत्येक याचिकेला वेळ ठरवून दिला जाणार आहे.
Maharashtra Political Crisis Shivsena MLA Disqualification Hearing