मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात खडाजंगी झाली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने येथील विधानभवन येथील विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयाला सील ठोकले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयाबाहेर मराठीत एक नोटीस चिकटवण्यात आली असून, त्यावर ‘शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयाच्या सूचनेनुसार हे कार्यालय बंद आहे’, असे लिहिले आहे.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सहकार्याने महाराष्ट्रात स्थापन झाले आहे. या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यासाठीच विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून होत आहे. आज सकाळी ११ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभापतीपदासाठी निवडणूक होत आहे. आज तब्बल १३ दिवसांनंतर पहिल्यांदाच शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने येणार आहेत. शिवसेनेच्या ३९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्याचवेळी ठाकरे यांच्याकडे केवळ १६ आमदार उरले आहेत.