मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अखेर विधानसभेत अविश्वास दर्शक ठरावासाठी (फ्लोअर टेस्ट) सहमती दर्शवली आहे. बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले की, शिंदे गटाचे आमदार विधानसभेत कोणत्याही क्षणी फ्लोर टेस्टला सामोरे जाण्यास तयार आहेत. मात्र, या टेस्ट वेळी सर्वप्रथम शिंदे गटाला बहुमत दाखवण्याची संधी द्यावी, अशी अट त्यांनी घातली आहे. आम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
बंडखोर गटामध्ये आणखी एक ते दोन आमदार येतील, असा दावाही केसरकर यांनी केला आहे. त्यांच्या पाठिंब्याने आणि इतर अपक्ष उमेदवारांमुळे आमचे संख्याबळ ५१ पर्यंत वाढेल. येत्या तीन-चार दिवसांत आम्ही निर्णय घेऊ आणि त्यानंतर थेट महाराष्ट्रात येऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटीस विरोधात एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बंडखोर आमदारांनी आघाडी उघडली असून, सरकार कोसळण्याची धमकी दिली आहे.
महाराष्ट्राचे आणखी एक मंत्री उदय सामंत रविवारी गुवाहाटी येथे आले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या असंतुष्ट छावणीत ते सामील झाले. गुजरातमधील सूरत येथून सामंत हे गुवाहाटी येथे पोहोचले. ते विशेष चार्टर्ड विमानाने आले. त्यांच्यासोबत अन्य तिघे जण होते.
https://twitter.com/ANI/status/1541075008566337539?s=20&t=XJTv-48yTynSL2l5mq58XA
Maharashtra Political Crisis rebel Shinde group ready for floor test