मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षी पहिला भूकंप झाल्यानंतर आता आज दुसरा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूड पडल्याचे वृत्त आहे. अजित पवार यांच्या समर्थनार्थ ५४ पैकी तब्बल ३५ आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व आमदार भाजप आणि शिंदे गटासोबत सत्ताधारी सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे वृत्त होते. यापूर्वी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवेळी भाजपसोबत संधान बांधले होते. मात्र, आता अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत
दिलीप वळसे पाटील
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
किरण लहमाटे
सरोज अहिरे
नरहरी झिरवाळ
अशोक पवार
अनिल पाटील
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी दौलत दरोडा
अनुल बेणके
रामराजे निंबाळकर
धनंजय मुंडे
निलेश लंके
मकरंद पाटील
हे सर्व आमदार असल्याचे सांगितले जाते.
अजित पवार यांच्यासोबत ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासोबतच खासदार डॉ.अमोल कोल्हे हे सुद्धा अजित पवार यांच्यासोबत आहेत. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित होते.