मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्याने सरकार अडचणीत आले आहे. अशा परिस्थितीत मंत्रालयात मात्र प्रचंड लगबग सुरू आहे. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेला मोठे खिंडार पाडले आहे. त्यामुळेच शिंदेंसह त्यांचे समर्थक तब्बल ४०हून अधिक आमदार सध्या गुवाहाटीत आहेत. एकीकडे शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सरकारी निवासस्थान वर्षा सोजून मातोश्री गाठले आहे. तर दुसरीकडे मंत्रालयात सरकारी अध्यादेश (जीआर) काढण्याची जणू चढाओढ लागली आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसात तब्बल १०६ जीआर काढण्यात आले आहेत. तसेच, आमदारांना सुमारे ३१९ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात मविआ सरकार कोसळले तरी या सरकारी आदेशांप्रमाणे नजिकच्या काळात कामे होऊ शकणार आहेत.
maharashtra political crisis mantralay government published 106 gr