मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्या अंतिम निकाल देणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरविले जाण्याची शक्यता सर्वत्र वर्तविली जात आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे चर्चाही सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
फडणवीस हे सध्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील खरीप पूर्व हंगाम नियोजन बैठक घेत आहेत. विदर्भातील विविध जिल्ह्यात त्यांनी या बैठका घेण्याचे काम सुरू केले आहे. याचवेळी त्यांना सत्तात संघर्षाच्या सुनावणीविषयी माध्यमांनी विचारले. त्यावर फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पुढील निवडणुका लढविणार आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, फडणवीस यांच्या या प्रतिक्रीयेमुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालय हे शिंदे यांच्या बाजूने निकाल देणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. फडणवीस यांना न्यायालयाचा निकाल आधीच माहित झाला आहे का, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1656290787909599237?s=20
Maharashtra Political Crisis Devendra Fadnavis Reaction