मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पोलिसांच्या बदल्या आणि बढतींना मुहुर्त; या कालावधीत होणार

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 11, 2022 | 5:31 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
police...

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदली आणि बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. दिवाळीनंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढतीला मान्यता मिळणार आहे. परंतु सध्या केवळ वरिष्ठ पातळीवरील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असून पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक या पदाच्या आंतर जिल्हा बदल्या करण्यात येणार नाहीत. मात्र या पदाच्या समक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या केवळ परिक्षेत्र व आयुक्त कार्यालयाच्या क्षेत्रातच करण्यात येणार आहे, असे सांगण्यात येते.

शासकीय नोकरी म्हटली की बदली ही आलीच, शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या दर तीन ते पाच वर्षांनी बदल्या होत असतात. अनेक वेळा काही कारणामुळे वर्षभरानंतरही बदल्या करण्यात येतात. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या यंदा मार्च एप्रिल महिन्यात होणार होत्या, परंतु काही कारणास्तव त्या लांबल्या. तसेच बढती देखील झाली नाही. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात राज्यात सत्तांतर झाल्याने बदली प्रकरण आणखीनच रखडले. आता यास मुहुर्त लाभला आहे.

वास्तविक पाहता काही अधिकाऱ्यांचा सेवाकाळ २०२१ मध्येच पूर्ण झाला असून ते वर्षभरापासून बदलीच्या आदेशाची वाट बघत आहे.
सुमारे दोन-तीन वर्षांपासून कोरोनामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात झाल्या नव्हत्या, मात्र नंतरच्या काळात दोन वर्षात मार्च व एप्रिल ऐवजी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये काही प्रमाणात या बदल्या करण्यात आल्या होत्या. यंदा मात्र या बदल्या मार्चमध्येच होतील, अशी शक्यता असताना बदल्यांचा कालावधी लांबत गेला. त्यातच सण उत्सव आले आणि मध्यंतरी महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आले. सध्या गृहमंत्री पदाचा कार्यभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यामुळे आता तरी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकर होतील असे मानले जात आहे.

नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचा बंदोबस्त संपला असून त्यानंतर आता दिवाळीचाही बंदोबस्त लागेल. परिणामी आता दिवाळीनंतरच बदल्यांची यादी काढली जाईल. असे सांगण्यात येते. परंतु कदाचित गृहमंत्री फडणवीस हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या तातडीने करू शकतात. विशेषतः वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेचच होतील, मात्र मध्यम स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या त्या त्या कार्यक्षेत्रातच होणार असल्याची समजते. त्याचप्रमाणे विनंती बदल्या आणि बढती होण्याची देखील शक्यता आहे. विशेषतः वादग्रस्त वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची बदली सोयीच्या ठिकाणी होणार असून त्यांना बढती देखील मिळणार असल्याचे सांगण्यात येते. काही कारण असो, मात्र पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष बदल्यांकडे लागले आहे, असे दिसून येते.

Maharashtra Police Transfer and Promotion
Home Department

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान! अहमदनगर जिल्ह्याला पुढील इतक्या दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा

Next Post

अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन लग्नानंतर ४ महिन्यांनी झाले जुळे; सरकार करणार चौकशी; पण का?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Capture 17

अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन लग्नानंतर ४ महिन्यांनी झाले जुळे; सरकार करणार चौकशी; पण का?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना धनलाभाचे संकेत मिळतील, जाणून घ्या, बुधवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 5, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओपदी या अधिका-याची नियुक्ती

ऑगस्ट 5, 2025
Screenshot 20250805 190544 WhatsApp 1

नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला आढावा

ऑगस्ट 5, 2025
IMG 20250805 WA0276 1

आंदोलनानंतर फुटलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू होणार

ऑगस्ट 5, 2025
Rorr EZ Sigma Electric Red I 16 9

ओबेन इलेक्ट्रिकने नेक्स्ट-जेन रॉर ईझी सिग्मा लाँच केली…या तारखेपासून डिलिव्हरीला सुरुवात

ऑगस्ट 5, 2025
fir111

गिफ्ट हाऊसमध्ये बालकामगार, व्यावसायीकास पडले चांगलेच महागात…गुन्हा दाखल

ऑगस्ट 5, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011