इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र, पोलीस भरती प्रक्रियेमागील समस्या काही केल्या संपण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस भरती अर्जासाठी अखेरचा एक दिवस शिल्लक असताना संबंधित संकेतस्थळाच्या तांत्रिक त्रुटींमुळे उमेदवारांना त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे पोलिस भरती अर्ज भरती प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुकांना १५ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
महाराष्ट्र पोलीस खात्याअंतर्गत पोलिस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख देण्यात आली होती. मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची संकेतस्थळ सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाउन होणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे.
सर्व्हर डाउन होणे, वेबसाइट हँग होत असल्याने रात्रभर जागून उमेदवार आपले अर्ज भरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात आता शुल्क भरले तरी ते जमा होत नसल्याने अर्ज अपूर्ण असल्याचे दिसत असल्याने भरतीसाठी पात्र असलेले ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी भरतीपासून वंचित राहतील अशी भीती व्यक्त केली जात होती.
https://twitter.com/dhananjay_munde/status/1596772981551702016?s=20&t=CdPeg1c8ojKxiMmmEXCG9w
अर्जासोबत लागणारे शुल्क ऑनलाईन भरल्यानंतरही अर्जासोबत ती जमा झालेले दिसत नाही. दुसरीकडे खात्यातून मात्र हे पैसे वजा होत आहेत. या सर्व गोंधळात अर्ज मात्र अपूर्ण राहत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे पोलिस भरती अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी ट्वीटद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
https://twitter.com/Devendra_Office/status/1597524539009007616?s=20&t=CdPeg1c8ojKxiMmmEXCG9w
Maharashtra Police Recruitment Application Server Down
Job