बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर; तीन पोलिस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

by India Darpan
ऑगस्ट 14, 2023 | 7:26 pm
in संमिश्र वार्ता
0
police

३३ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर ४० पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर
नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ आज जाहीर करण्यात आली. यासह राज्यातील ३३ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ असे राज्यातील एकूण ७६ पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहे.

‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ आणि ‘पोलीस शौर्य पदक’, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष २०२३ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण ९५४ पोलिसांना ‘पोलीस पदके’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना समावेश आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे यांचा समावेश आहे. राज्यातल्या ३३ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. पोलीस शौर्य पदकांमध्ये रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील,भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे,कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार यांचा समावेश आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ राज्यातल्या ४० पोलिसांना जाहीर झाले आहे. यामध्ये प्रवीणकुमार पडवळ (पोलीस सहआयुक्त, मुंबई शहर), विजय पाटील (पोलीस उप महानिरीक्षक, एसीबी, मुंबई), राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनपुडे पाटील, अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, सुनील नवार, संजय माळी, अंबादास हुलगे, शामराव गडाख, मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बाविस्कर, कैलास नागरे आणि महादेव पाटील यांचा समावेश आहे. सविस्तर यादीचा तपशील www.mha.gov.in आणि https://awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

maharashtra-police independence day awards declared

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद…. सीमा हैदरने दिल्या घोषणा… व्हिडिओ व्हायरल

Next Post

मालेगाव होमगार्डचे समादेशक अधिकारी अय्युबखान अहमदखान पठाण यांना राष्ट्रपती पदक जाहिर

India Darpan

Next Post
IMG 20230814 WA0252 1

मालेगाव होमगार्डचे समादेशक अधिकारी अय्युबखान अहमदखान पठाण यांना राष्ट्रपती पदक जाहिर

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011