मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गृहमंत्रालयाने २०२३ साठी उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली आहेत. देशभरातून १४० अधिकाऱ्यांची या पदकांसाठी निवड करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्राला एकही पदक मिळालेले नाही. तर सर्वाधिक पंधरा पदके सीबीआयने पटकावली आहेत.
स्वातंत्र्यदिन काही दिवसांवर आला असतानाच गृहमंत्रालयाने २०२३ साठी उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली आहेत. देशभरातून १४० अधिकाऱ्यांची या पदकांसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राला एकही पदक न मिळाल्याने हे पोलिसांचे मोठे अपयश असल्याची चर्चा रंगली आहे. या यादीमध्ये सीबीआयने बाजी मारली असून यंदा सर्वाधिक म्हणजे १५ पदके सीबीआयला व १२ पदके राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशला १० व केरळला ९ पदके मिळाली आहेत. या यादीमध्ये आंध्र प्रदेशला ५ , आसाम- ४ , बिहार – ४ , छत्तीसगढ- ३, गुजरात- ६ , हरयाणा ३, झारखंड २, कर्नाटक ५ , मध्य प्रदेश ७. ओडिशा ४ , पंजाब २ , राजस्थान ९ , मणिपूर , मेघालय , मिझोराम , सिक्किम , त्रिपुरा , उत्तराखंड , चंडीगड प्रत्येकी १ , तामिळनाडू ८. तेलंगणा ५ , प . बंगाल ८ , दिल्ली ४ , अंदमान निकोबार , दादरा नगर हवेली , लदाख , लक्षद्वीप , पुडुचेरी प्रत्येकी १ पदक मिळाले
कधीकाळी होता दबदबा
कधीकाळी स्कॉटलँड पोलिसला मागे टाकण्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसला यंदाही एकही पदक मिळालेले नाही. यावरून राज्यातील पोलिसिंगचा दर्जा ढासळलाय की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
maharashtra police