मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर झाला आहे. तब्बल ४० दिवसांनी हा विस्तार झाला आहे. आज एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. नव्या मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
– आज शपथ घेतलेले सर्वच्या सर्व १८ हे कॅबिनेट मंत्री
– भाजपचे ९ तर शिंदे गटाचे ९ असे एकूण १८ जणांना संधी
– पुढच्या टप्प्यातील विस्तारात राज्यमंत्र्यांना थपथ
– एकाही महिला आमदाराला संधी नाही. त्यामुळे पुरुष प्रधान मंत्रिमंडळ
– औरंगाबाद जिल्ह्याला तीन मंत्रिपदे
– उत्तर महाराष्ट्राला तीन मंत्रिपदे
– वादात सापडलेल्या अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना संधी
– शिंदे गटाचे आक्रमक नेते संजय केसरकर यांचा पत्ता कट
– भाजपकडून वजनदार नेते आशिष शेलार यांना संधी नाही
– अपक्ष आणि घटक पक्षातून एकालाही मंत्रिपद नाही
– लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मंत्र्यांना संधी
– राज्याच्या सर्वच भागातील आमदारांना संधी देण्याचा प्रयत्न
– गेल्या वेळी राज्यमंत्री असलेल्यांचे प्रमोशन यंदा कॅबिनेट खाते
– पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेणारे मंगलप्रभात लोढा यांना थेट कॅबिनेट खात्याची लॉटरी
– मंत्रिमंडळ विस्तारावर देवेंद्र फडणवीस यांची छाप
– अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना मंत्रीपदाची संधी
– उद्धव ठाकरे यांनी मविआ सरकारमध्ये ज्यांना मंत्री केलं नाही अशा शिवसेनेच्या २ बंडखोर आमदारांना एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच टप्प्यात मंत्रिमंडळात संधी दिली आहे. ते म्हणजे तानाजी सावंत आणि दीपक केसरकर
– वर्षभरापूर्वी केंद्रात मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी पहिली शपथ घेतली होती नारायण राणे यांनी. आज मंत्रिमंडळ विस्तारात पहिली शपथ घेतली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी. त्यामुळे हा नवा भाजप असल्याची टीका
– पंकजा मुंडे यांच्या नावाची कुठलीही चर्चा नाही
– उद्धव ठाकरे यांना आणखी अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी अतिशय चलाखीने आपल्या गटातील आमदारांना संधी दिली
Maharashtra New Cabinet Characteristics