मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. केवळ महानगरे आणि शहरांपुरतेच मर्यादित न राहता आदिवासी आणि दुर्गम भागातही पोहचण्यासाठी मनसेने काम सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या रविवारी (१३ मार्च) एक विश्वविक्रम केला जाणार आहे. एकाचवेळी तब्बल ११०० आदिवासी वधुवरांचा सामुहिक लग्नसोहळा संपन्न होणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव यात सहभागी होणार आहेत. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने विवाह सोहळा हा विक्रमच असल्याचे मनसे नेत्यांचे म्हणणे आहे. या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांचे लग्नकार्यातील मोठा खर्च वाचणार आहे. मनसेच्यावतीने या सोहळ्याचा खर्च केला जाणार आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील डहाणू रोडवर असलेल्या सुरकर (मामा) मैदानात या भव्य सोहळा रविवारी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या उपस्थित राहणार आहेत.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1502520932564611073?s=20&t=5HuXtRJrB1aacOYMhcsrbw