पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक दिवसांपासून पावसाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार आहे. यासंदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाने माहिती दिली आहे. शनिवारी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात अद्यापही धरणांमध्ये जेमतेम पाणी आहे. तसेच, शेतपिकेही पावसापासून वंचित आहेत. आता ४ सप्टेंबरपासून राज्यात पाऊस धो धो कोसळणार आहे. तसेच, आयएमडीने म्हटले आहे.
पुण्यातील हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की ४ सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा पाऊस कोसळणार आहे.
हवामान अंदाजाचा बघा हा व्हिडिओ
Maharashtra Monsson Rainfall Forecast Weather Climate