सोमवार, डिसेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पावसाळी अधिवेशनात नक्की काय झाले? कुठले विधेयक संमत झाले? महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?

ऑगस्ट 26, 2022 | 11:46 am
in राज्य
0
vidhan bhavan

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नैसर्गिक आपत्तीत तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना पाच हजार रुपये मदत करण्यात येत होती. त्यामध्ये तिपटीने वाढ करून पंधरा हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासारखेच शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

कोविडच्या निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले आहे. 9 दिवसांमध्ये 6 दिवसाचे कामकाज झाले. माझ्या दृष्टीनं हे अधिवेशन खूप यशस्वी ठरले असे मुख्यमंत्र्यांनी सांगून या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. पुरवणी मागण्यांच्या विधेयकांसह महत्त्वपूर्ण अशी विधेयके मंजूर करण्यात आली.

या अधिवेशनात एकूण 10 विधेयके मंजूर करण्यात आली तसेच काही घोषणा करण्यात आल्या
– भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत अभिनंदन प्रस्ताव
– नवनियुक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव.
– औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याबाबत, तसेच नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण करण्याचा केंद्र शासनाला शिफारस करण्याचा विधानमंडळाचा ठराव.
– या अधिवेशनात विविध विभागांच्या 25 हजार 826.72 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली.
– थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक.
– राज्यात “एक दिवस बळीराजा” साठी ही संकल्पना राबवणार.

– सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळणार.एनडीआरएफ पेक्षा दुप्पट मदत
– पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर.
– शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा.
– आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण.
– मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार तीन वर्षात काम पूर्ण करणार.
– धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास नेणार.
– गिरणी कामगारांना 50 हजार सदनिका देण्यासाठी उपलब्ध होत आहेत. त्या त्यांना देण्यात येतील.
– मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली.

– बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी.
– बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये मालकी हक्काचे घर.
– मेट्रो मार्ग 5 चा विस्तार करण्यात येणार आहे.
– महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के व कक्षेबाहेरील 50 टक्के पदभरती करणार.
– राज्यात सात हजार पोलिसांची भरती करणार.
– 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांची घरे मालकी हक्काने देण्यात येईल.
– शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार.

– मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार.
– हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार.
– हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर
– आश्रमशाळांसाठी 600 कोटींची तरतूद.
– राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करणार.
– कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स फी
– वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
– राज्यात साकवांचे रूपांतर पुलांमध्ये करण्याचा निर्णय.
– रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी.

– पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग.
– स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा केंद्राला मान्यतेसाठी पाठवला.
– खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प.
– जलजीवन मिशन अंतर्गत रायगडमध्ये 1 हजार 70 पाणी पुरवठा योजना मंजूर.
– बहिर्जी नाईक, उमाजी नाईक यांच्या स्मारक परिसराच्या विकासासाठी निधी दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य.

Maharashtra Monsoon Assembly Session Output

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महानुभाव संप्रदायाच्या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी दिली ही ग्वाही

Next Post

आदिवासी विभागाचा लाचखोर बागुलकडे मायाच माया; नाशिक, पुणे, धुळ्यात संपत्ती… आलिशान घरे… पैसे मोजण्यासाठी मागविले मशिन…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
ACB

आदिवासी विभागाचा लाचखोर बागुलकडे मायाच माया; नाशिक, पुणे, धुळ्यात संपत्ती... आलिशान घरे... पैसे मोजण्यासाठी मागविले मशिन...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011