शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यातील २२ आमदार निघाले परदेशवारीला… जर्मनी, नेदरलॅंड्स आणि यु.के. दौरा करणार…

ऑगस्ट 24, 2023 | 8:07 pm
in संमिश्र वार्ता
0
vidhan bhavan

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सन्माननीय सदस्यांसाठी दिनांक २४ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर,२०२३ या कालावधीत तीन युरोपीय देशांच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासदौऱ्यात २२ सन्माननीय सदस्य सहभागी झाले आहेत. या दौऱ्यात ०६ अभ्यासभेटी, बैठका होणार आहेत. या परदेश अभ्यास दौऱ्याला परराष्ट्र व्यवहार मंत्रालय,भारत सरकार, यांची मान्यता (Political Clearance) प्राप्त झाली आहे. अभ्यास दौऱ्यावरील सन्माननीय सदस्यांचे शिष्टमंडळाचे नेतृत्व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे करत आहेत. फ्रॅंन्कफर्ट (जर्मनी), ॲमस्टरडॅम (नेदरलँड्स) आणि लंडन (यु.के.) या शहरांना भेट देईल. एकूण २२ सन्माननीय सदस्यांमध्ये निम्म्या संख्येने म्हणजे ११ महिला सदस्या या शिष्टमंडळात सहभागी झाल्या आहेत.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालयाला तसेच अन्य अभ्यासभेटींचे आयोजन
अभ्यासदौऱ्यात प्रारंभी फ्रॅंन्कफर्ट येथे सामाजिक, सांस्कृतिक तसेच कृषी आणि दुग्धउत्पादन क्षेत्रातील तज्ञांबरोबर तसेच भारताचे उच्चायुक्त यांच्यासमवेत बैठक होईल. त्याचप्रमाणे जर्मनीत स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्य करणाऱ्या अभ्यासगटाबरोबर चर्चा-संवाद आयोजित करण्यात आली आहे.

ॲमस्टरडॅम येथे नेदरलॅंडच्या विविध क्षेत्रांतील तज्ञांबरोबर तसेच संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच (UN Women And Gender Equality Forum) सदस्यांसोबत अभ्यासभेट, चर्चा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भारताचे नेदरलॅंडमधील राजदूत यांचीही अभ्यासभेटीवरील सन्माननीय सदस्य भेट घेतील.

त्याचप्रमाणे लंडन येथे देखील भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच, लंडन, (UN Women Orgnisation And Gender Equality Forum in United Kingdom), लंडनमधील मराठी मंडळाचे पदाधिकारी, यु.के. पार्लमेंट मधील राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालय आणि महासचिव (Secretary-General, CPA Headquarters) यांच्या समवेतदेखील अभ्यासभेट आयोजित करण्यात आली आहे.

Maharashtra MLA MLC Germany Netherlands UK Tour
Member Legislative Council Assembly Aamdar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा… काश्मीर फाईल्ससह या चित्रपटांची निवड… बघा, संपूर्ण यादी

Next Post

ग्रामीण रस्त्यांची पोलखोल… सीईओंनी थेट रस्ताच खोदायला लावला… कंत्राटदारांचे धाबे दणाणले…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20230824 WA0341 e1692884930678

ग्रामीण रस्त्यांची पोलखोल... सीईओंनी थेट रस्ताच खोदायला लावला... कंत्राटदारांचे धाबे दणाणले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011