मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पश्चिम विक्षोभामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने तशी माहिती दिली आहे. त्यामुळेच पुढचे पाच दिवस राज्याच्या काही भागात पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी तशी माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी म्हटले आहे की, उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम राज्यात होणार आहे. त्यामुळेच काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. येत्या ६ ते ९ जानेवारी दरम्यान हा प्रभाव राहणार आहे. 6 जानेवारी रोजी धुळे आणि नंदुरबार, 7 जानेवारी रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर, 8 जानेवारी रोजी ठाणे, पालघर व उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग तर, 9 जानेवारी रोजी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे.
अधिक माहितीसाठी खालील नकाशा पहावा