मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमचे सर्व आमदार परत येणार असा दावा करणाऱ्या शिवसेना खसादार संजय राऊत यांनी अखेर मोठे भाष्य केले आहे. शिवसेनेच्यावतीने बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे काम सुरू होते. मात्र, त्यात कुठलेही यश येताना दिसत नाही. तसेच, बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल ४० आमदारांचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीची दखल अखेर शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. त्यामुळेच संजय राऊत यांनी एक ट्विट करुन त्याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास हा विधानसभा बरखास्तीच्या दिशेने होत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. म्हणजेच, बंडखोर आमदार हे परत येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, संख्याबळासाठी लागणारे आमदार नसल्याने अखेर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते दुपारुन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1539490296412643328?s=20&t=u4simUNJ_yj7FDfRTmu6NQ
maharashtra mahaaliance government sanjay raut indication