मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड पूर्ण झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र पाठवले होते. त्या पत्रानुसार शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अबादास दानवे यांची नियुक्ती करण्या आली आहे. उपसभापती गोऱ्हे यांनी त्यास मान्यता दिली आहे.
औरंगाबाद आणि मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात शिवसेनेला मोठे भगदाड पाडले आहे. त्याची दखल ठाकरे यांनी घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमधील अंबादास दानवे यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आले आहे. सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. अजित पवार हे सध्या विरोधी पक्ष नेते आहेत.
शिवसेनेचे विधान परषदेतील आमदार मनीषा कायंदे, सचिन अहिर, अंबादास दानवे, विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांच्या शिष्टमंडळाने उपसभापती नीलम गोर्हे यांची भेट घेतली होती. त्यात उद्धव ठाकरे यांचे पत्र गोऱ्हे यांना देण्यात आले. त्यात विरोधी पक्षनेतेपद आणि मुख्य सचेतक पद यांचा उल्लेख होता. राज्याच्याविधानपरिषदेत भाजपचे २४, शिवसेनेचे १२, काँग्रेसचे १० आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १० तर ४ आमदार आहेत. तसेच, विधान परिषदेच्या १५ जागा सध्या रिक्त आहेत. भाजप सध्या सत्ताधारी आहे. त्यामुळे विरोधकांपैकी शिवसेनेकडे संख्याबळ अधिक आहे. त्यानुसार अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद गेले आहे.
Maharashtra Legislative Assembly Opposition Leader appointed
Shivsena MLC Ambadas Danve