मुंबई – विधान परिषदेच्या सहा जागांसाठी सध्या निवडणूक होत आहे. त्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मात्र, य़ातील एक जागा बिनविरोध करण्यात यश आले आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. भाजपने त्यांच्या विरोधातील उमेदवाराला माघार घेण्यास सांगितली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. प्रज्ञा या काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले. त्यात यश आले. या निवडीबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रज्ञा सातव यांना निवडीचे प्रमाणपत्र दिले आहे. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.
https://twitter.com/INCMaharashtra/status/1462760772761579522?s=20