कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्या पृथ्वीराज पाटील याच्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठी घोषणा केली आहे. यासंदर्भात भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. तब्बल २५ वर्षांनंतर महाराष्ट्र केसरीचा किताब कोल्हापूरला मिळाला आहे. याची दखल घेत भाजपच्यावतीने पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार करण्याच येणार आहे. पाटील यांना ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. हे पैसे त्यांना पुढील सरावासाठी उपयुक्त ठरतील, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/Devendra_Office/status/1513066450130726913?s=20&t=IgFQGzRnZLDTSnSt-nbL7g