मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चांगलाच चिघळला आहे. काल, बुधवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात याचे हिंसक पडसाद उमटले आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही राज्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आजपासून (दि.८ ) सुरू झालेल्या या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही या सीमा प्रश्नाचे तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न संसदेत मांडला. परंतु भाजप आणि शिंदे गटाच्या खासदारांनी या प्रश्नांवर कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने विरोधकांनी निषेध व्यक्त केला आहे.
एकीकडे या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, माझी या प्रश्नांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा झाली असून हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्यात येईल, कारण कोणत्याही प्रकारे दोन्ही राज्यांमध्ये आणखी ताण-तणाव निर्माण झाल्यास त्याचा सर्वसामान्य जनतेला फटका बसेल आणि त्यातून कोणाचेही भले होणार नाही. त्यासाठी योग्य त्या चर्चेतून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीही आपण केंद्र सरकार तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणारा असून हा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाचा मुद्दा तापल्यामुळे गेल्या दोनमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. कर्नाटकमध्ये काल मंगळवारी महाराष्ट्रातील वाहनांना कन्नड वेदिका रक्षणच्या कार्यकर्त्यांकडून लक्ष्य करण्यात आले होते. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने फोनवरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा केली.
एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करताना आपल्यालाही सीमाभागात शांतता हवी असल्याचे बसवराज बोम्मई यांनी सांगितले. दोन्ही राज्यांमध्ये शांतता आणि कायदा-सुव्यवस्था असावी, यावर आमचे एकमत झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सलोख्याचे वातावरण राहणार असले तरी सीमभागाबाबत आमची भूमिका तसूभरही बदललेली नाही. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात याबाबतची कायदेशीर लढाई लढू, असे बसवराज बोम्मई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
विशेष म्हणजे म्हणजे एका बाजूला सामोपचाराची भाषा करायची आणि दुसरीकडे डिवचायचे, असा प्रकार असल्याची प्रतिक्रिया अनेकजण व्यक्त करत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, संबंधित वाद सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सीमा भागातील मराठी बांधवांना कोणाताही त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबतही याबाबत चर्चा करण्यात आली, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
शिंदे आणखी म्हणाले की, मी बोम्मई यांना सांगितले की, महाराष्ट्राचे जे नागरीक तिकडे जात आहेत त्यांना कोणताही त्रास दिला होऊ नये. ज्यांनी गैरप्रकार केला, तोडफोड केली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यावर त्यांनी मान्यता दिलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही माझी चर्चा झाली, अशी माहिती शिंदे यांनी दिली. तसेच हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असेपर्यंत तरी दोन्ही राज्यातील कायदा व्यवस्था सुरळीत राहायला पाहीजे. तसेच मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही चर्चा केली, असेही ते म्हणाले.
Maharashtra Karnataka Border Issue Today Happenings