इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळला असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा वाद विकोपास नेण्याचा प्रयत्न सुरू केल्याने महाराष्ट्रातील जनता प्रचंड संतप्त झाली आहे. त्यातच आज दि. ६ डिसेंबर रोजी सांयकाळच्या सुमारास महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कर्नाटक मधील कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली. यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला तीव्र शब्दात कडक शब्दात इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील जनतेवरील हल्ले त्वरित थांबवा अन्यथा मला बेळगावला यावे लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच यासंदर्भात काही दुर्दैवी घटना घडल्यास त्याला सर्वस्वी कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार राहील, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील हिरे बागेवाडी जवळ महाराष्ट्र राज्यातील वाहनांना लक्ष करण्यात आले असून वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. कन्नड संघटनांनामुळे शहराचे वातावरण बिघडू नये यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी राष्ट्रीय महामार्ग आणि इतर ठिकाणी कन्नड संघटना जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत असून हिरे बागेवाडीत महाराष्ट्र राज्यातील ट्रक व इतर वाहनांवर चढून गोंधळ घालण्यात आला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्तारोको केला. तसंच रस्त्यावर लोळण घेत वाहने अडवली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1600121181700775938?s=20&t=_2duIvGV9jIB-L-qAEkDWw
या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्रही गेली अनेक वर्षे वादात आहे. निवडणुकीचा सीमावादाशी काहीही संबंध नाही. सुप्रीम कोर्टात एक केस आहे आणि मला जिंकण्याचा विश्वास आहे. तसेच निवडणुका डोळ्यासमोर आल्याशिवाय वाद होणार नाही. महाराष्ट्रातील कन्नडिगांच्या संरक्षणासाठी सरकार तयार आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1600122193127821312?s=20&t=_2duIvGV9jIB-L-qAEkDWw
शरद पवार यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार म्हणाले, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आज घडले ते निषेधार्ह आहे. हसीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर कृत्य आणि वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. येत्या २४ तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणे, त्यांना त्रास देणे थांबवण्यात आले नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असाही शरद पवार यांनी दिला आहे.
कर्नाटक सरकारच्या आडमुठे धोरणावर महाराष्ट्र सरकार गुळमुळीत भूमिका घेत असल्याची टीका ठाकरे गटाने वारंवार केली आहे. आता कन्नड रक्षण वेदिकेच्या हल्ल्यानंतर ठाकरे गटानेही आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर इचलकरंजीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आंदोलन केले. कर्नाटक गाडीच्या समोर केली निदर्शने महाराष्ट्रात कर्नाटकची एकही गाडी फिरू देणार नाही असा घेतला पवित्रा मनसेने घेतला आहे. महाराष्ट्रातील मनसे आता जशास तसे उत्तर देणार, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी मांडली.
बेळगाव मध्ये सुरू असलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र एसटी प्रशासन सतर्क झाले आहे. जर कर्नाटक प्रशासन किंवा आंदोलन ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून राज्यांची सीमा ओलांडू दिली नाही तर महाराष्ट्रातून कर्नाटक कडे जाणाऱ्या बस थांबवल्या जातील. एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पेटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पुन्हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Maharashtra Karnataka Border Issue Opposition Leaders Threat
Sharad Pawar MNS NCP Shivsena Congress