नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनच्या वतीने दरवर्षी खेळाडू, संघटक, प्रशिक्षक, पंच यांच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेवून विविध पुरस्कार दिले जातात. या वर्षीही दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र जंप रोप असोसि यशन चे अध्यक्ष विष्णु भांगळे(जळगांव) पांडुरंग रण माळ (परभणी, कैलाश कांखरे (धुळे) राज्य सरचिटणीस विक्रम दुधारे आणि खजिनदार दिपक निकम यांनी केली.
यामध्ये सन २०२१-२२ या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार सतीश तात्या महाले (ढुळ) यांना जाहीर झाला आहे. तर सन २०२१ साठी उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून प्रशांत परगावकर (पालघर) आणि सन २०२२ साठी उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून अमन वर्मा (ठाणे) यांना गौरवण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट पंच म्हणून नायन नायर (ठाणे सन २०२१) आणि तन्मय कर्णिक(नाशिक-सन- २०२२) यांची निवड करण्यात आली आहे.
याचबरोबर सन २०२१ आणि २०२२ या वर्षामध्ये आयोजित राष्ट्रीय स्पर्धामध्ये पदके मिळविणाऱ्या खेळाडूंना गौरवण्यात येणार आहे. यामध्ये नमन गंगवाल(नाशिक), योगिता सावंत(ठाणे), सोहम गुरुळे(नाशिक), तनुजा भोईर (पालघर), अदिती फडणवीस (अहमदनगर), गौरव सोनटक्के, भावेश कोरडे (दोघंही पालघर), आणि राजुल लुंकड (नाशिक) यांचा समावेश आहे. याचबरोबर नाशिक (महाराष्ट्र), उदयपुर (राजस्थान), आणि आग्रा (उत्तर प्रदेश) येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके प्राप्त केलेल्या महाराष्ट्राच्या १५० खेळाडूंनाही गौरविण्यात येणार आहे. तर या वर्षामध्ये चांगले कं करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याला चांगला उदयोन्मुख जिल्हा तर बीड जिल्ह्याला प्रोत्साहानपर जिल्हा म्हणून उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा नाशिकच्या श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या हॉलमध्ये आयोजित केला जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनचे सरचिटणीस विक्रम दुधारे यांनी दिली.