मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक श्रेणीतील पदांवर राज्यातल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून विविध पदावर त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अपर पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथकाचे सदानंद दाते यांची पदोन्नती होऊन पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची पदोन्नती करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे विभागाचे अप्पर पोलीस महासंचालरक बिपीन कुमार सिंह यांची पदोन्नती होऊन मुंबईच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीत बृहनमुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, ठाणे शहर, नांदेड इत्यादी ठिकाणच्या अपर पोलीस आयुक्तांची पदोन्नती झाली असून त्यांची विविध ठिकाणी पदस्थापना करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीतील पदावर पदोन्नती देण्याकरिता निवड सूची २०२३ तयार करण्यात आली आहे. १२ जणाची निवड सूची तयार करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा – (सध्याचे पद आणि बदलीच्या ठिकाणचे व पदोन्नतीचे पद कंसात दिले आहे)
संजय दराडे अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई (विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे),
ए.डी. कुंभारे अपर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई ( विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक मुंबई ),
एम. आर. घुर्ये, अपर पोलीस आयुक्त गुन्हे नवी मुंबई, (विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे ),
संजय शिंदे अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड (पोलीस सह आयुक्त पिंपरी चिंचवड ),
डी. एस. चव्हाण अपर पोलीस आयुक्त मुंबई (विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर परिक्षेत्र )
डी. आर. सावंत अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई ( विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा मुंबई ),
आर. बी. डहाळे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर ( संचालक प्रादेशिक गुप्त वार्ता अकादमी पुणे ),
अशोक मोराळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर (विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव बल नागपूर ),
एस.एच. महावरकर पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र (विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र ),
निसार तांबोळी अपर पोलीस आयुक्त वाहतूक, मुंबई (विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासन , पोलीस महासंचालक यांचे कार्यालय मुंबई)
एस. डी. येनपुरे पोलीस उप महानिरीक्षक पोलीस बिनतारी पुणे (विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ),
डी.जी. सुपेकर अपर पोलीस आयुक्त प्रशासन पुणे शहर ( विशेष पोलीस महानिरीक्षक मुख्यालय कारागृह विभाग पुणे ).
बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे अशी :
के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर परिक्षेत्र (विशेष पोलीस महानिरीक्षक आस्थापना पोलीस महासंचालक यांचे कार्यालय मुंबई ),
मनोज लोहिया पोलीस सह आयुक्त पिंपरी चिंचवड (पोलीस आयुक्त संभाजीनगर).
जयजितसिंह पोलीस आयुक्त ठाणे शहर ( पोलीस आयुक्त, ठाणे शहर ),
सदानंद दाते अपर पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक, (पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक मुंबई )
बिपिन कुमार सिंह अपर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे मुंबई ( व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ )
अभिनव देशमुख पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई (अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई ),
अनिल पारसकर पोलीस उपआयुक्त मुंबई ( अपर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई ),
एम. रामकुमार पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई ( अपर पोलीस आयुक्त वाहतूक शाखा बृहन्मुंबई ) ,
शशीकुमार मीना समादेशक राज्य राखीव बल मुंबई (अपर पोलीस आयुक्त गुन्हे बृहन्मुंबई )
प्रवीण पाटील समादेशक राज्य राखीव पोलीस बल पुणे ( अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर ),
संजय बी. पाटील पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई (अपर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर ),
वसंत परदेशी समादेशक राज्य राखीव पोलीस बल दौंड (अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड ),
एच.डी. आव्हाड पोलीस अधीक्षक बुलढाणा (पोलीस उप महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ),
पी.पी. शेळके कार्यकारी संचालक सुरक्षा विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुंबई (अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग नागपूर शहर ),
ए.एच. चावरिया पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ( अपर पोलीस आयुक्त प्रशासन पुणे शहर )
वीरेंद्र मिश्रा पदस्थापनेच्या प्रतीक्षेत (अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई ),
दीपक साकोरे पोलीस उप महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे (अपर पोलीस आयुक्त गुन्हे नवी मुंबई ).
Maharashtra IPS Officers Transfer Order Home Ministry