आरोग्य शिक्षणात क्रांती घडवणारे
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
डॉ. स्वप्नील तोरणे (जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ)
गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण आणि संशोधन कार्यात भरारी घेणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जागतिक स्तरावर कार्याचा ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्य केले आहे. विद्यापीठाचे कुलपती तथा महामहिम मा. राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी, विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना.श्री. अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी राबविलेल्या सुधारणांमुळेच वैद्यकीय शिक्षणाला एक नवी दिशा प्राप्त झाली आहे.
एकसमान आरोग्य शिक्षणासाठी आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाचा आढावा घेण्यासाठी भारत सरकारने 1947 नंतर अनेक समित्या नेमल्या. 1983 मध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटंुब कल्याण मंत्रालयाने नेमलेल्या वैद्यकीय शिक्षण आढावा समितीने स्वतंत्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती. 1987 मध्ये डॉ.जे.एल. बजाज यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सुध्दा अशीच शिफारस केली होती. या सर्व शिफारशींमुळे सार्वजनिक आरोग्य व कुटंुब कल्याण मंत्रालयाने आरोग्य विज्ञान विद्यापीठे स्थापन करण्याबाबत प्रा. सईद अहमद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने आरोग्य विद्यापीठाच्या आवश्यकतेवर भर दिलाच तसेच अशा विद्यापीठांमध्ये वैद्यक, दंतवैद्यक, आयुर्वेद व युनानी, होमिओपॅथी तसेच औषधी, तत्सम आरोग्य शाखा यांच्यासाठी स्वतंत्र विद्याशाखा असाव्यात असे मत मांडले होते. त्यानुसार 1991 मध्ये केंद्राने प्रत्येक राज्यामध्ये एक आरोग्य विज्ञान विद्यापीठ असावे असा विचार केला व त्यांनी तसे प्रत्येक राज्याला कळविले.
देशामध्ये दर्जेदार डॉक्टर निर्माण व्हावेत व त्यांनी दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवावी यासाठी विविध आरोग्य विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांचा समावेश असलेली स्वतंत्र आरोग्य विद्यापीठे स्थापन केल्याशिवाय पर्याय नव्हता. यापूर्वी आरोग्य अभ्यासक्रम हे अकृषी विद्यापीठांकडे संलग्न होते. विविध विद्यापीठांमध्ये वेगवेगळया प्रकारचे अभ्यासक्रम असल्यामुळे आरोग्य अभ्यासक्रमामध्ये समानता नव्हती. ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी व अभ्यासक्रमात साधर्म्य आणण्यासाठी सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम आरोग्य विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात आणण्यात आले.
महाराष्ट्रात 03 जून 1998 रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना झााली. या विद्यापीठाची मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर येथे विभागीय केंद्रे आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेच्यावेळी 193 संलग्नित महाविद्यालये होती. आजपावेतो 425 पेक्षा अधिक महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत. आरोग्य विद्यापीठाच्या आजवरच्या कार्यामुळे येथे शिक्षित झाालेले डॉक्टर्स आणि इतर पॅरामेडिकल्स आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम काम करीत आहे.
विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जात सुधारणा केल्या. त्यामुळे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स निर्माण करण्यात नाशिकचा सिंहाचा वाटा आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे विद्यापीठाला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद हे प्रादेशिक विभाग जोडण्यात आले आहेत. यामुळे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्राचे असले तरी प्रभावी माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने कामकाज सुयोग्यरित्या कार्यरत आहे.
आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांची नियुक्ती झाल्यानंतर विद्यापीठातर्फे अनेक नवीन व अभिनव उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. कोविड-19 च्या काळात आरोग्य विद्यापीठाने उल्लेखनीय काम केले या परिस्थितीत ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्ष परीक्षा घेऊन विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर आदर्श निर्माण केला असल्याचे विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या जाहिर भाषणात सांगितले.
युक्रेन येथील युध्दजन्य परिस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षण घेणाÚया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आरोग्य विद्यापीठ व इल्सेविअर या संस्थेच्या विद्यमाने डिजिटल कटेंन्ट तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून ऐच्छिक व ऑनलाईन स्वरुपाचे शिक्षण विद्यार्थी घेत आहेत. विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. श्री. अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेला हा उपक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वपूर्ण ठरला आहे.
आरोग्य विद्यापीठातर्फे ’इंटरनॅशनल एज्युकेेशन हब’ कार्यान्वीत करण्यात आले असून याद्वारे अन्य विद्यापीठ व संस्थांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्याव्दारा मोठया प्रमाणात आरोग्य शिक्षण व संशोधन विषयक कार्य केले जात आहे. विद्यापीठातर्फे ग्रीष्मकालीन आंतरवासियता उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबर संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि इतर विद्वत्तापूर्ण तपासांमध्ये सैद्धांतिकज्ञान आणि विद्यार्थ्यांचे व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
प्रतिष्ठित संस्थेमध्ये वास्तविक जीवनाचा अनुभव व व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यास विद्यार्थ्यांना मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून सदर योजना विद्यापीठाने सुरू केली आहे. योजनेत निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रति आठवडा रुपये दोन हजार पाचशे इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी सुमारे दोन ते चार आठवडे इतका असणार आहे. विद्यापीठाने निर्देशित केलेल्या समर इंटरंशिप प्रोग्रम संेंटरवर ग्रीष्मकालीन आंतरवासियता पूर्ण करणाÚया विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
विद्यापीठाने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटायझेशनच्या दिशेने वाटचाल सुरू केली. नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पात्रतेपासून हॉलतिकिट, शोधप्रबंध, सिनॉप्सिस ऑनलाईन झाल्यामुळे एकूणच प्रक्रियेत अचुकता वाढली असून कमी मनुष्यबळातदेखील प्रभावीरित्या कार्य करता येऊ लागले आहे. खर्चामध्ये मोठया प्रमाणावर बचत झाली असून एकूणच कालावधीमध्ये बचत झाल्याने वेगवानता आली आहे. कागदपत्रे, छपाई, पुनर्ःप्रती या गोष्टी टाळल्या जात असल्यामुळे कागदांची बचत होऊन पर्यावरणपूरक कामकाज केले जात आहे.
विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयांमध्ये विविध शैक्षणिक, परीक्षा विषयक व प्रशासकीय सुधारणा राबविल्या आहेत.
वर्गात आणि चिकित्सालयात विद्यार्थ्यांना सक्तीची उपस्थिती, सुनिश्चित शैक्षणिक वेळापत्रक, विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली अध्यापन पध्दती, सर्व विद्याशाखांचे अभ्यासक्रम आणि पाठयक्रम अद्ययावत करणे, विविध विषयांची एकात्मिक अध्यापन पध्दती आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कौशल्य वृध्दीसाठी, सुनियोजित व साचेबध्द आंतरवासियता कार्यक्रम, महाविद्यालयांची कालबध्द तपासणी संलग्नित महाविद्यालयांतील शैक्षणिक व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा पहिल्या संलग्निकरणासाठी कठोर निकष, शिक्षकांची मान्यता, शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आदी प्रशासकीय बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
आरोग्य विद्यापीठ परिसरात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन संस्थेस शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. नाशिक येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या शिक्षणाबरोबरच रूग्णालयांच्या माध्यमातून रूग्णसेवादेखील होणार आहे. आरोग्यसेवा व संशोधन कार्यासाठी पदव्युत्तर महाविद्यालय समाजासाठी महत्वपूर्ण असणार आहे. विद्यापीठ परिसारात सुमारे पदवीच्या 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे व त्यास संलग्न 430 खाटांचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. याचबरोबर 15 विषयांमध्ये 64 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा उपलब्ध होणार आहे. यामध्ये दरवर्षी वाढ होणार असून याचा नाशिक विभागातील रुग्णांना मोठया प्रमाणावर लाभ होणार आहे. तीन वर्षानंतरच साधारण तीनशेपेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टर रुग्णसेवेसाठी रुग्णालयामार्फत उपलब्ध होऊ शकतील.
समाजात अवयवदानसाठी प्रोत्साहन व मोठया प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने विद्यापीठातर्फे ’महाअवयवदान अभियान’ यांचे सातत्याने आयोजन करण्यात येते. अवयवदान जनजागृतीसाठी विविध मान्यवरांचे ऑनलाईन मार्गदर्शन व विविध विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात येतात त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय असतो.
समाजात लैगिंकतेविषयी असलेला दृष्टीकोन व्यापक व्हावा तसेच स्त्री-सबलीकरण, लिंगभावात्मक न्याय याअनुषंगाने विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. लिंगभावात्मक संवेदनशिलता ही आपल्या व्यक्तीमत्वात रुजायला हवी. आपल्या घरापासूनच याची सुरवात करायला हवी. आपल्या कुटुंबातील व्यक्तींसमवेत वागतांना आपण आपल्या मुलांसमोर कोणते आदर्श ठेवत आहोत याविषयी सजगता बाळगणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुष समानता आपल्या विचारांमध्ये आली तरच समाजात खÚया अर्थाने निर्माण होईल. यासाठी स्त्री-पुरुष समानतेचा सर्वांनी जागर करावा. प्रगत आणि संवेदनशील समाजासाठी सामाजिक परिवर्तन घडणे गरजेचे यासाठी विद्यापीठाकडून महिला अधिकारी व कर्मचारी यांना ’ब्रेक द बायस’ मंत्र देण्यात आला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता व संशोधन वाढीसाठी ’नॅक’ निर्देशित केलेल्या मापदंडाचा अवलंब करणेबाबत महाविद्यालयांना निर्देशित करण्यात आले आहे. या अनुषंगाने विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील 850 पेक्षा अधिक शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. नॅकच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केल्यास मुलभूत प्रक्रिया व कार्यपध्दतीत महाविद्यालयांना अडचणी येणार नाहीत.
मालेगाव मॅजीक:
सर्वत्र ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असतांना मालेगांव येथील रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. यासंदर्भात शास्त्रीय कारणमीमांसा शोधून काढणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व अभ्यांगत यांचे पथक नेमण्यात आले असून ते मालेगावात सर्वेक्षण करत आहेत. या सर्वेक्षणात संगणकीकृत पध्दतीने रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली असून सर्व माहितीचे निष्कर्ष काढल्यानंतर शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होणे गरजेचे आहे. मा. कुलगुरुयांच्या या संकल्पनेतून मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात ’ग्रीन कॅम्पस’ उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या वृक्षरोपण मोहिमेला महाराष्ट्र दिनी प्रारंभ करण्यात आला. नाशिक येथील विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील 750 विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे तसेच राज्यातील सर्व संलग्नित महाविद्यालय परिसरात सुमारे 75000 रोपांची लागवड करण्याचा संकल्प विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.
विद्यापीठाचे विविध उपक्रमांची माहिती, परीक्षा, निकाल, वेळापत्रक आदींसाठी युजर फें्रडली वेबसाईट तयार करण्यात आली असून आपल्या संगणक, लॅपटॉप व मोबाइलवर वापरण्यासाठी सुलभ आणि गतिमान सर्च इंजिन असलेल्या विद्यापीठ वेबसाईटची मराठी व इंग्रजी भाषेत असून त्याचा विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणात उपयोग होणार आहे. तसेच शिक्षक, विद्यार्थी व अभ्यागतांना शिक्षण आणि संशोधनासाठी महत्वपुर्ण डिजिटल लायब्ररी उपलब्ध व्हावी या संकल्पनेतून ’निम्बस लायब्ररी’ विद्यापीठ संकेतस्थळाशी जोडण्यात आली असून तिचा सर्वांना लाभ होईल. विद्यापीठातील विविध विभागात सुरु असेलेले कामकाज, वस्तुंची मागणी, पुरवठा, पारदर्शिता व गतीमानता यावी यासाठी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टमचा अवलंब करण्यात आला आहे. या प्रणालीव्दारे ऑनलाईन मागणी नोंदवून खरेदी विभागाकडून जलदरितीने वस्तुचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट मोबाइलवर डन्भ्ै ।चच अॅपव्दारा विद्यापीठाची माहिती, व्हिजन डॉक्युमेंट, बृहत आराखडा, राष्ट्रीय सेवा योजनांची माहिती, विविध उपक्रम, आंतरवासियता योजना संदर्भात माहिती, डिजिटल लायब्ररी, ग्रीष्मकालीन आंतरवासियता कार्यक्रम, रॅगिंग प्रतिबंधासाठी माहिती, संशोधन, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमाविषयी माहिती या अॅपव्दारा उपलब्ध होणार आहे. डिजिटल जगात जागतिक स्तरावर भरारी घेण्यासाठी विद्यापीठाने अॅपच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.
विद्यापीठाचे पुणे येथील विभागीय केंद्र विस्तारीत करणे तसेच डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स, इम्युनॉलॉजी, बायोकेमिस्ट्री अॅण्ड न्युट्रिशन विभागाच्या अंतर्गत जेनेटिक आणि मॉलीक्युलर बायोलॉजी विषयात अधिक संशोधन व्हावे याकरीता ’स्वर्गीय डॉ. के.सी. घारपुरे’ यांच्या नावाने प्रयोगशाळा संचलीत करण्यात आली आहेे. भारतीय औषध संशोधन संस्थेच्या सहकार्याने शिक्षण, संशोधन, प्रभावी प्रात्यक्षिके आदींचा विस्तार करण्यात मदत होणार आहे. जेनेटिक व मॉलीक्युलर बायोलॉजी क्षेत्र यामध्ये संशोधन कार्याला मोठा वाव आहे या अनुषंगाने विद्यापीठाने सामंजस्य करार केला असून लवकरच जेनेटिक लॅब कार्यान्वीत होईल.
मा. कुलगुरु यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी ‘कुलगुरु का कट्टा’ उपक्रम सुरु करण्यात आला असून शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी व समस्या येतात. त्यासंदर्भात विद्यार्थ्यांशी या उपक्रमाच्या माध्यतातून संवाद साधणार आहे. महाविद्यालय स्तरावर सर्वच समस्यांचे निराकरण करणे शक्य होत नाही. ई-मेलव्दारा प्राप्त विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या, तक्रारी व सूचनांची दखल विद्यापीठाकडून घेतली जाणार आहे. या संदर्भात नियोजित वेळेनुसार मा. कुलगुरु ऑनलाईन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सकारात्मक बदलांमुुळे शैक्षणिक प्रमाणकांमध्ये लक्षणीय सुधारणा, परीक्षांच्या निकालात विहित वेळेत लागणे, पारदर्शक परीक्षापध्दती विषयी विद्यार्थ्यांना विश्वास, विद्यार्थ्यांकडून सुसंवादात वाढ, अशा वैशिष्टयपूर्ण बदलांमुळे विद्यापीठाची यशस्वी वाटचाल होत आहे.