नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेकजण स्थिर नोकरीच्या शोधात असतात. यामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. अशा सर्वांसाठी एक चांगली संधी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. विविध पदांच्या १२२ जागांसाठी विद्यापीठात भरती निघाली आहे. या जागा कोणत्या व त्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे हे आपण जाणून घेऊ. या सर्व जागांसाठी muhs.ac.in या वेबसाइटवर अर्ज करता येणार आहे. ७ सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
लिपिक कम टंकलेखक / DEO / रोखपाल / भांडारपाल
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट. आणि मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट.
एकूण जागा – ५५
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
लघुटंकलेखक
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, लघुलिपी ८० श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.
एकूण जागा – १४
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
वरिष्ठ सहायक
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, ३ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – ११
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
शिपाई
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
एकूण जागा – ९
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक
एकूण जागा – ८
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
वरिष्ठ लिपिक/DEO
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.
एकूण जागा – ८
आणखीन विविध पदांसाठी भरती आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल. या पदांविषयीचा सविस्तर तपशील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वेबसाइटवर देण्यात आला आहे.
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
नोकरीचे ठिकाण – नाशिक
Maharashtra Health Science University MUHS Recruitment Job Vacancy