मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाळी अधिवेशनाला सामोरे जाणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने पूर्वसंध्येला मोठी घोषणा केली आहे. देशाच्या स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त देशभरात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच अंतर्गत आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आता एस.टी.चा प्रवास मोफत करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. हा लाभ नक्की कधीपासून मिळेल हे मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र, यासंदर्भात राज्य सरकारकडून लवकरच आदेश काढले जाणार आहेत. आणि एसटी महामंडळाकडून त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1559576173633343488?s=20&t=Jh9sqgfwzPuSSQqz5jlWWw
Maharashtra Govt Decision ST Free Travelling
above 75 Year Old Citizens
Cabinet Decision