बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कृषि पुरस्कारांनी १९८ शेतकऱ्यांचा होणार सन्मान! २ मे रोजी नाशिक येथे कृषि पुरस्कार प्रदान भव्य सोहळा

by Gautam Sancheti
एप्रिल 27, 2022 | 8:00 pm
in राज्य
0
dada bhuse

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील कृषि, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्‍पादन- उत्‍पन्‍नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. दि. २ मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषि विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते, तो कार्यक्रम आता २ मे रोजी होणार आहे. कृषि, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्‍पादन- उत्‍पन्‍न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्‍तारामध्‍ये बहुमोल कामगिरी करणा-या व्‍यक्‍ती, संस्‍था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात २ मे रोजी सकाळी ११ वाजता तीन वर्षातील १९८ पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्‍यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी, फलोत्‍पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुरस्‍कारार्थींना रोख रकमेसोबत स्‍मृतीचिन्‍ह,सन्‍मानपत्र व सपत्‍नीक/ पतीसह सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. सर्व पुरस्‍कारप्राप्‍त शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्‍हणून कृषि विभागातील विविध योजनांमध्‍ये कार्य करणार असल्याचेही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

कष्टातून आपल्या शेतीत प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या या गौरव सोहळ्याचे थेट प्रसारण https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषि विभागाच्या युट्यूब चॅनेलवरुन होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.

पुरस्कारांच्या संख्येत वाढ
सन २०२० पासून विविध कृषि पुरस्‍कार मार्गदर्शक सूचनांमध्‍ये बदल करण्‍यात आले असून यामध्ये वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्‍कार संख्‍या १० वरुन ८ करण्यात आली आहे. राज्याच्या सर्व विभागांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी विभागनिहाय एक याप्रमाणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कारांची संख्‍या २५ वरुन ४० करण्यात आली असून जिजामाता कृषिभूषण पुरस्‍कार संख्‍या ५ वरुन ८ तर वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार ३ वरुन ८, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्‍कार ९ वरुन ८ करण्‍यात आली आहे. सन २०२० पासून प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे युवा शेतकरी पुरस्‍कार देण्यात येणार असल्याचे सांगून पीकस्‍पर्धा रब्‍बीच्या तालुका, जिल्‍हा ,विभाग व राज्‍य पातळ्यांवरील बक्षीसांच्‍या रक्‍कमेमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

१९८ पुरस्कारार्थ्यांचा ‘या’ पुरस्कारांनी होणार सन्मान
● डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्‍न पुरस्कार – ४ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ७५ हजार रुपये)
● वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्‍कार -२८ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ५० हजार रुपये)
● जिजामाता कृषिभूषण पुरस्‍कार – ९ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ५० हजार रुपये)
● कृषिभूषण (सेंद्रिय शेती) – २३ पुरस्‍कारार्थी (प्रत्येकी ५० हजार रुपये)
● वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार – ९ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ३० हजार रुपये)
● उद्यानपंडीत पुरस्‍कार – २५ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी २५ हजार रुपये)
● वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कार – सर्वसाधारण गट – ५७ पुरस्‍कारार्थी, आदिवासी गट – १८ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ११ हजार रुपये)
● राज्‍यस्‍तरीय पीकस्‍पर्धा- खरीप भात – ९ पुरस्‍कारार्थी, खरीप सोयाबीन ९ पुरस्‍कारार्थी – प्रत्‍येकी प्रथम क्रमांक – १० हजार रुपये, व्दितीय क्रमांक- ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक ५ हजार रुपये
● पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्‍न पुरस्‍कार – ७ पुरस्‍कारार्थी.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवड – सोग्रस सोसायटीच्या सभापतीपदी बाबुराव गांगुर्डे तर उपसभापतीपदी राजाराम शिंदे यांची बिनविरोध निवड

Next Post

‘महा आवास अभियान २०२०-२१’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; बघा कोणकोणत्या शहरांचा होणार सन्मान

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
कांद्याच्या भावासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सप्टेंबर 17, 2025
Next Post
Hasan Mushrif 1 680x375 1

‘महा आवास अभियान २०२०-२१’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; बघा कोणकोणत्या शहरांचा होणार सन्मान

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011