रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यात प्रथमच साजरा होणार महसूल सप्ताह… अशी असतील त्याची वैशिष्ट्ये…

by India Darpan
जुलै 29, 2023 | 4:35 pm
in मुख्य बातमी
0
logo 8 1140x570 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे. यंदा प्रथमच राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन राज्यभरात केले जाणार आहे. तरी, शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होईल यावर लक्ष केंद्रित करत अशासकीय व नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

महसूल सप्ताहाचे आयोजन तसेच राज्यात नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी या निमित्ताने मंत्री श्री. विखे-पाटील यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. दरम्यान, महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन सदर सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाबाबत मार्गदर्शनही त्यांनी केले.

श्री. विखे-पाटील म्हणाले, राज्य शासन प्रथमच महसूल सप्ताह साजरा करणार आहे, तरी हा सप्ताह महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी एकत्रितपणे यशस्वी करावा. महसूल सप्ताहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यामुळे महसूल विभागातील अधिकारी- कर्मचारी यांच्यामध्ये असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळेल. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना सहभागी करुन घ्यावे. जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यात एकोपा निर्माण होईल. तसेच महसूल विभागातील जे अधिकारी कर्मचारी यांचे पाल्य कौतुकास्पद कामगिरी करत आहेत, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत, त्यांचाही गौरव सोहळा आयोजित करावा, असे श्री. विखे-पाटील यांनी नमूद केले.

श्री. विखे पाटील पुढे म्हणाले की, महसूल सप्ताह यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग येथे सप्ताहाचे फ्लेक्स लावावेत, सप्ताहाची परिपत्रकाद्वारे प्रसिद्धी करावी. या सप्ताहाच्या निमित्ताने आयुक्तांनी संबंधित तालुक्यात व जिल्ह्यातील दुर्गम भागांना भेट द्यावी. सप्ताह निमित्त जनजागृती करावी. तसेच सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम रेव्हेन्यू मिनिस्टर डॅशबोर्डवर अपलोड करावेत. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. महसूल कार्यालयांची स्वच्छता राखावी. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूला मोठे गिफ्ट… व्यावसायिकाने दिली ही ऑफर…

Next Post

शिर्डीच्या प्रसादालयातील ‘त्या’ पदार्थाची राष्ट्रपतींना भुरळ… थेट काढले हे आदेश…

Next Post
F2JABQRbIAAKNwg

शिर्डीच्या प्रसादालयातील 'त्या' पदार्थाची राष्ट्रपतींना भुरळ... थेट काढले हे आदेश...

ताज्या बातम्या

st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
Untitled 40

पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला…६ जणांचा मृत्यू, २५ जण वाहून गेले

जून 15, 2025
Screenshot 20250615 152229 Collage Maker GridArt

ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये होणार पक्षप्रवेश…स्थानिकांचा विरोध मावळला

जून 15, 2025
cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011