मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात अनेक राजकीय घडमोडी होत असतानाच राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्या खालीलप्रमाणे
ओमप्रकाश दिवटे – इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिंद्र प्रताप सिंग – PMPML, पुणेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ओम प्रकाश बकोरिया – PMPML अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावरुन समाज कल्याण आयुक्त, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशांत नरनावरे – समाजकल्याण आयुक्त, पुणे येथून महिला व बाल आयुक्त, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
विमला आर. – महिला आणि बाल आयुक्त, पुणे येथून मुख्य कार्यकारी अधिकारी M.S. खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.