मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. शिंदे-फडणवीस सरकार गेल्या वर्षी जुलै महिन्यात स्थापन झाले. तेव्हापासून अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. आताही अनेक अधिकाऱ्यांना नवी नियुक्ती देण्यात आली आहे.
नाशिक महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचीही बदली करण्यात आली आहे. सध्या ते मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे आहे. पुलकुंडवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले आहेत. गेल्या वर्षीच त्यांची नियुक्ती नाशिकमध्ये झाली होती. आणि आता त्यांच्याकडे पुण्यात साखर आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक मनपा आयुक्तपदी अद्याप राज्य सरकारने कुणाचीही नियुक्ती केलेली नाही.
अधिकारी आणि त्यांच्या बदल्यांचे आदेश असे
(अधिकाऱ्याचे नाव, सध्याचे पद आणि बदलीनंतरचे ठिकाण)
1. श्रीमती सुजाता सौनिक – IAS (1987) ACS (AR&OM), GAD, मंत्रालय, मुंबई यांना ACS (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
2. श्री एस व्ही श्रीनिवास – IAS (1991) MC, MMRDA, मुंबई यांना OSD, धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
3. श्री लोकेश चंद्र, IAS (1993) GM, BEST, मुंबई यांची CMD, MAHADISCOM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्रीमती राधिका रस्तोगी, IAS (1995) यांना PS आणि विकास Commr., नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
5. श्रीमती I.A.कुंदन, IAS (1996) PS, महिला आणि बाल कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना PS, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
6. श्री संजीव जयस्वाल, IAS (1996) PS, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांची VP आणि CEO, म्हाडा, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. श्री आशीष शर्मा, IAS (1997) AMC, BMC, मुंबई यांना PS(2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
8. श्री विजय सिंघल, IAS (1997) CMD, MAHADISCOM, मुंबई यांची GM, BEST, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. श्रीमती अंशु सिन्हा, IAS (1999) CEO, M.S.खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची सचिव, OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. श्री अनुप कृ. यादव, IAS (2002) सचिव, अल्पसंख्याक विभाग. विभाग यांची सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
11. श्री तुकाराम मुंढे, IAS (2005) यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12. डॉ. अमित सैनी, IAS (2007) CEO, MMB, मुंबई यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
13. श्री चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस (2008) एमसी, नाशिक एमसी, नाशिक यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
14. डॉ. माणिक गुरसाल, IAS (2009), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) यांची CEO, Mah.Maritime Board, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
15. श्रीमती कादंबरी बलकवडे, IAS (2010) MC, Kolhapur MC, Kolhapur यांची DG, MEDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
16. श्री प्रदिपकुमार डांगे, IAS (2011) Jt.Secy.-c-Mission Director, SBM (ग्रामीण), पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग. मंत्रालय, मुंबई यांना संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्त केले आहे.
17. श्री शंतनू गोयल, IAS (2012) आयुक्त, MGNREGS, नागपूर यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
18. श्री पृथ्वीराज बी.पी., IAS (2014) जिल्हाधिकारी, लातूर यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
19. डॉ. हेमंत वसेकर, IAS (2015) CEO, NRLM, मुंबई यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
20. डॉ. सुधाकर शिंदे, IRS (1997) यांची AMC, BMC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra Government IAS Officer Transfer