मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज काढले आहेत. महिला व बाल कल्याण आयुक्त राहुल महिवाल यांची बदली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर यांची पुण्यात महिला व बाल कल्याण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेडचे अधिकारी विपीन इटणकर यांना नागपूर जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर, मुंबईत एमएमआरडीएचे सह आयुक्त असलेल्या राहुल कर्डिले यांची वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी तातडीने नवा पदभार घेणार आहेत.
Maharashtra Government IAS Officer Transfer